अवघ्या ६ वर्षाचा असलेला रॅन एवढ्या लहान वयातच कोट्याधीश झाला आहे.
Ryan Toys Review

सध्या इंटरनेट च्या जमान्यात लोकांना वस्तू घेण्याआधी असुद्या नाहीतर चित्रपट पाहायला जाणे असुद्या, आधी review बघूनच लोक आपली पसंती ठरवतात. याचाच फायदा घेत या चिमुकल्या करोडपतीच्या पालकांनी मार्च, २०१५ ला Ryan Toys Review हा Youtube वर चॅनेल काढला.
नंतर चॅनेल चे नाव Ryan’s World असे करण्यात आले. त्यावर नवनवीन ‘खेळण्यांचा उलगडा’ आणि ‘बेबी खाद्यपदार्थ’ या छोट्याशा रॅन कडून करून त्याची चित्रफीत बनवून ती Youtube वर टाकायला सुरुवात केली.
परंतु सुरुवातीच्या काही महिन्यात त्यांच्या चित्रफीतींना बघणारे लोक खूप कमी होते. अचानक महिन्याला त्यांचे दर्शक वाढत गेले. सध्या त्यांच्या प्रत्येक चित्रफितीला करोडोंच्यावर दर्शक पाहत असतात. ‘फोर्ब्स’ च्या यादीनुसार रॅन जगात Youtube वर सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्यांच्या यादीत आठव्या स्थानी आहे.
सध्या त्याच्या चॅनेल चे २५ मिलियन म्हणजेच २.५ करोड Subscriber आहेत. २०१९ या वर्षात त्याने १८२ करोड रुपये कमावल्याचे जाहीर केले आहे. २०१८ वर्षी १५७ करोड रुपये कमावले होते.
२०१७ मध्ये त्याच्या Ryan’s World चॅनेल ने जवळपास ७१ कोटी रुपये कमावल्याचे जाहीर केले होतेे.
या चिमुकल्याच्या अमेरिकेतील प्रसिद्धीमुळे त्याला वॉलमार्ट सारख्या कंपनी ने अनेक ऑफर सुद्धा दिल्या आहेत. यातून सुद्धा त्याला पैसे मिळतात. गेल्यावर्षी जुलै २०१९ मध्ये त्याने स्वतःची टूथपेस्ट आणि टूथब्रश ची कंपनी काढली आहे.
ह्या चिमुकल्याकडून अनेकांनी आदर्श घ्यायला हवा.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो