पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी

0
पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी

Pune’s wrestler Abhijit Katake won Maharashtra Kesari 2017 tournament

भुगाव, पुणे: रविवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेतेपदाची चुरशीची लढत पुण्याच्या अभिजीत कटके आणि सातारचा किरण भगत यांच्यात झाली, त्यात अभिजीत कटके याने सातारच्या किरण भगतला १० विरूद्ध ७ असे गुण पटकावत महाराष्ट्र केसरी २०१७ वर आपले नाव कोरले. या विजेतेपदाला विरोध करत पैलवान काका पवार यांनी पंचानी पक्षपातीपणे निर्णय दिल्याचा आरोप केल्याने सर्व कुस्तीशौकिनांच्यात खळबळ माजली आहे.

हजारो कुस्तीप्रेमीच्या उपस्थितीत ही विजेतेपदाची लढत झाली. महाराष्ट्र केसरी विजेतेपदाची गदा अभिजित कटके यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आली.

Photo Credit's

अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत कटके हा सुरवातीपासूनच आघाडी राखत खेळत होता. मात्र भगत यानेही त्यास चुरशीची लढत देत कुस्तीची मजा आणली. शेवटी कटके विजेतेपद जिंकत यंदाचा महाराष्ट्र केसरी पुण्यात आणल्याने सर्वत्र आनंदी वातावरण आहे.

@PunetiSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.