अकिलिस: फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंदाज बांधणारा पांढरा बोका, कोण जिंकेल पहिला सामना?

0
अकिलिस: फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंदाज बांधणारा पांढरा बोका, कोण जिंकेल पहिला सामना?

सेंट पीटर्सबर्ग, रशिया: हर्मिटेज संग्रहालयातील अकिलिस नावाचा पांढरा बोका 2018 च्या फिफा विश्वचषक विजेत्यांचे अंदाज लावण्यासाठी निवडण्यात आला आहे.

गेल्यावर्षी कॉन्फेडरेशन कप पारंपारिक प्री-मॅच चा अंदाज बांधण्यासाठी अधिकृत भविष्यक म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. तेथे त्याने चार मॅचच्या निकालांपैकी तीन योग्य अंदाज देत सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

कोण जिंकेल पहिला सामना, अकिलिस चा अंदाज

21 व्या फिफा विश्वचषक स्पर्धा च्या पहिल्या सामन्यात यजमान रशियाचा सामना लूझनीकि स्टेडियम मॉस्को येथे सौदी अरेबिया बरोबर होईल. जुन्या शाही सारिस्ट कैपिटल च्या प्रेस सेंटरमध्ये ठेवलेल्या दोन देशांच्या झेंड्याच्या वाडग्यामधून बोक्याने रशियाचा झेंडा असलेला वाडगा निवडला. त्यावरून यजमान रशिया फिफा विश्वचषक स्पर्धा चा पहिला सामना जिंकेल असे वर्तवण्यात आले आहे.

फिफा विश्वचषक स्पर्धा मध्ये अंदाज बांधण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी ऑक्टोपस पॉलने फिफा विश्वचषक स्पर्धेबद्दल अंदाज वर्तवला होता, जे सत्य ठरले होते.

ऑक्टोपास पॉल च्या मृत्यूनंतर आता यावर्षी अकिलिस नावाचा पांढरा बोका अंदाज लावण्यासाठी निवडला गेला आहे. आता यावर्षी हे अंदाज किती खरे ठरतात हे पाहावे लागेल.
तुम्हाला याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

राहुल फटांगडे च्या खुनाचा व्हिडिओ प्रसिद्ध, समाजकंठकांकडून निर्घृणपणे खून

पावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी

LEAVE A REPLY