Aditya Thackeray Troll: ६ लाखाच्या बीएमडब्लू वरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल

0
Aditya Thackeray Troll: ६ लाखाच्या बीएमडब्लू वरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल

आदित्य ठाकरे यांनी वरळी मुंबई येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात पुन्हा एकदा Aditya Thackeray Troll ला बळी पडले आहे. त्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली संपत्ती घोषित करावी लागते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी आपली संपत्ती ११ कोटी ३८ लाख घोषित केली आहे.

आदित्य ठाकरे संपत्ती

Aditya Thackeray Car BMW 530D Gran Turismo

नामनिर्देशनपत्राच्या अनुसार, त्याच्या बँक खात्यामध्ये १०.६ कोटी शिल्लक आहे. अंदाजे 67 lakh lakh लाखांची अचल संपत्ती, बॉन्ड / शेअर्स / म्युच्युअल फंड यात ९७ लाख, सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने, १०.२२ लाख किंमतीची इतर गुंतवणूक आणि रोख ₹ 13,344. अशी एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती आदित्य ठाकरे यांनी घोषित केली आहे.

वकिली आपला व्यवसाय म्हणून व्यवसाय दाखविला असून, त्यानुसार ६.५० लाख किंमतीची 2010 मध्ये नोंदणीकृत बीएमडब्ल्यू कार आहे आणि त्याच्या सर्व मालमत्तेच्या नुसार यावर्षी ₹ २६,३०,५६० आयकर भरला आहे. यातील अनेक वस्तू आपल्या वडिलांकडून गिफ्ट म्हणून मिळाल्या असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

Aditya Thackeray Troll

यातील बीएमडब्ल्यू कार किमतीवरून अनेकांनी आदित्य ठाकरे यांना ट्रोल केले आहे. ६.५० लाख रुपयांना कोणती बीएमडब्ल्यू मिळते असा प्रश्न उपस्थित केला आहे.

त्यांच्या वकिली व्यवसायातून एवढी संपत्ती कशी झाली असे प्रश्न अनेकांनी विचारले आहेत.

 

Aditya Thackeray Car Details

त्यांनी घोषित केलेल्या बीएमडब्ल्यू कार चा क्रमांक MH 02 CB 1234 आणि मॉडेल BMW 530D Gran Turismo ही असून या गाडीची किंमत २०१० साली ६०-९० लाख होती. त्यात गाडीचा क्रमांक 1234 असा असल्याने त्याची किंमत त्यावेळी किती असेल हे वेगळे सांगायला नको.

आपल्याला या संपत्तीबद्दल काय वाटते? आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

NETIZENS ARE AGAIN TROLLING ANANT AMBANI, MEMES ARE GOING VIRAL

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook Twitter | Marathi Vinod

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.