पानिपत: द ग्रेट बिट्रेयल मध्ये सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारण्यासाठी अर्जुन शिकतोय मराठी

0
पानिपत: द ग्रेट बिट्रेयल मध्ये सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारण्यासाठी अर्जुन शिकतोय मराठी

अभिनेता अर्जुन कपूर सध्या पानिपत: द ग्रेट बिट्रेयल या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यग्र असून तो चक्क मराठीचे धडे गिरवत आहे. यावर्षी तो  ‘नमस्ते इंग्लंड’ आणि  ‘पानिपत: द ग्रेट बिट्रेयल’ या दोन्ही चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.

त्याचे हे  करिअरमधलं सर्वात महत्वाचं वर्षं ठरू शकते हे म्हणायला वाव आहे.  पानिपत युद्धावर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बिट्रेयल’ मधील सदाशिवराव भाऊ यांची मुख्य भूमिका अर्जुन कपूर साकारत असून तो त्यासाठी तयारी करत आहे.  आशुतोष गोवारीकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून पुढील वर्षी ६ डिसेंबर २०१९ रोजी हा प्रदर्शित होणार आहे.

नुकतेच अक्षय तृतीया निमित्त या चित्रपटाचा सेट उभारण्यास सुरुवात करण्यात आली.

अर्जुनने आता चक्क मराठीचे धडे गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपटातील भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी अर्जुनने हे पाऊल उचललं आहे. सदाशिवराव भाऊ ही भूमिका साकारण्यासाठी अर्जुनने अस्खलित मराठी शिकण्यावर भर देत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Panipat Movie: Ashutosh Gowariker is Set to Make a Movie on Panipat Third Battle, Casting Arjun Kapoor, Sanjay Dutt and Kriti Sanon

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

पानिपतवीर “दत्ताजी शिंदे” यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY