नुकताच सॅमसंग ने Note 8 बाजारात उतरवला असून सर्वात जास्त खपात सॅमसंग चा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ Apple चा दुसरा क्रमांक लागतो.
पण गेले काही महिने, Apple या USA कंपनी ला Huawei या चिनी कंपनीने खपात मागे टाकले आहे.
जून, जुलै आणि ऑगस्ट च्या मोबाईल फोन विक्रीमध्ये Huawei ने Apple ला मागे टाकलेले दिसत असून कंपनी सर्वाधिक खप असणाऱ्या सॅमसंग ला येत्या ३-४ वर्षात मागे टाकेल असा विश्वास Huawei च्या निर्मात्यांनी व्यक्त केला.
भलेही Apple च्या नवीन IPhone X नंतर Apple चा खप वाढेल परंतु Huawei च्या नवीन स्मार्टफोन्स नक्कीच सर्वांना पिछाडीवर टाकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.