ज्या दिवशी कर्जमाफी, तीच खरी दिवाळी !

0
ज्या दिवशी कर्जमाफी, तीच खरी दिवाळी !

सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली कर्जमाफी मनापासून दिली नसून, ती पूर्णपणे फसवी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. कर्जमाफी हा मोठा गोंधळ असून, रोज नवनवीन जीआर येत आहेत. यात अनेक अडचणी आल्या आहेत. अनेक शेतकरी यापासून वंचित असून, ही कर्जमाफी नावालाच आहे. कर्जमाफीची घोषणा करताना ती सरसकट असे सांगितल्याने आम्ही सरकारचे अभिनंदन केले होते. मात्र, सरकारची ही कर्जमाफी नंतर फसवी निघाली. ज्या दिवशी कर्जमाफी मिळेल, तीच खरी दिवाळी असेल, असा टोला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हाणला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमित्ताने खासदार सुळे नाशिकमध्ये आल्या होत्या. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी शिवसेना व भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. भाजपचे नेते भाषणे चांगली करतात; परंतु आश्‍वासने पाळत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. जीएसटीमुळे रोजगार घटल्याचे सरकारचेच अहवाल सांगतात. आज जगात कुठेच २८ टक्के जीएसटी नाही. मात्र, आपल्याकडे तो लावण्यात आला. त्याच वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम यांच्यासह आम्ही याला विरोध केला. मात्र, आता कुठे सरकारला जाग आली आणि आता यात बदल करायला ते तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र व राज्य सरकार ग्राहकांच्या फायद्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांवर कांदा प्रश्नावरून दबाव आणत आहेत. काही झाले की फौजदारी कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. जीएसटी नाही भरला फौजदारी, शेतकऱ्याकडून अर्ज चुकला फौजदारी, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी अशा पद्धतीने सरकार सर्वांनाच दबावात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, व्यापारी आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या दमबाजीविरोधात आंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने तरुणांच्या पाठीशी उभं राहू : मा. शरद पवार

 

शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…..?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.