हुंडा: देत नाही मागतात | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

1
हुंडा: देत नाही मागतात | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

हुंडा: देत नाही मागतात

पहिल प्रेम हे विसरता येत नाही अस ऐकलेलं पण आज बघायला ही मिळाल. “अमिता” च हे पहिलं प्रेम. खुप खुप प्रेम करायची ती त्याच्यावर. तोही तिच्यावर प्रेम करायचा मनापासून का ते ठाऊक नाही. पण तरीही दोघांच दोन-दोन;तीन-तीन तास मोबाईलवर बोलण असायचं. ती त्याला सगळ सगळ मनातल सांगायची तो ही ऐकत राहायचा. तो अस मन मोकळेपणान बोलायचा नाही पण ती मात्र रोजचा दिनक्रम त्याला सांगत बसायची. खुप खुश होती अमिता. लग्न ठरल होत तीच म्हणून.

सगळ लग्नाच वातावरण असताना अमितान सुमितला (अमिताचा होणारा नवरा) फोन करून सांगितल कि हुंडा नको. असला प्रकार आपल्या लग्नात नको. रोजच जस आपल ऐकून घेतो तस आज ही हे बोलन सुमित ऐकून घेईल अस अमिताला वाटल पण बदल्यात ऐकू आला सुमितच्या हसण्याचा आवाज. अग तुला कुठून हि गोष्ट लक्षात आली तुझ्या एवढ्याश्या डोक्यात. हि मोठ्यांची गोष्ट आहे. तू नको लक्ष देऊस. प्रत्येकालाच द्यावा लागतो हुंडा. तुला द्यावा लागेल तुझ्या बहिणीला माझ्या बहिणीला सगळ्याना द्यावा लागतोच अस बोलतो आणि फोन ठेवतो. पण अमिताला त्याचा राग येतो. प्रेम केल म्हणून राग मावळत नाही. ती त्याच्याशी बोलन कमी करते. दोन तीन तासाच बोलन आता ती तासाभरात उरकते.

हुंडा

बर हुंडा लग्नानंतर द्यायचा ठीक आहे. पण मुलाकडच्या घरातल्यांना पोशाख, मुलीच स्वतःच मंगळसूत्र, जोडव्या, दागिने सगळ सगळ सासुरवाडी कडून जस फर्मान येईल तस मुलीकडच्यांनी खरेदी करायचं वर लग्नाचा खर्च लग्नाचा हॉल आणि शेवटचा मान म्हणजे हुंडा. तो हि मुलीकडच्यांनीच द्यायचा अशी रीत अजूनही काही ठिकाणी आहे. कितीही शिकलेली मुलगी असो, घरंदाज असो वा गरीब यातून कुणाची सुटका नाही. खर तर हुंडा घेणे या गुन्ह्यातून गुन्हेगाराची सुटका नाही पण चित्र जरा वेगळ आणि विचित्रच आहे. हि कथा आहे तुमच्या आमच्यातल्या दडलेल्या अशा आरोपी लोकांची जे हुंडा देत नाहीत पण मागतात…..
याचा दुसऱ्या भागात असेल एक कथा जी सत्य घटनेवर आधारित आहे. तूर्तास रजा द्यावी.

भाग : १.
मूळ लेखिका: अमृता वाणी.
शब्दरचना: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.