पुणेरी बापाचे पत्र: मुलास खरमरीत समज देणारे पत्र…!!

0
पुणेरी बापाचे पत्र: मुलास खरमरीत समज देणारे पत्र…!!

पुणेरी बापाचे पत्र: मुलास खरमरीत समज देणारे पत्र…!!

हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच..

पुणेरी बापाचे पत्र:

प्रिय दिनकर, ( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )

चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे, ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर….!!! हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल…!! हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे…!! हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात, जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे. गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण एक सांगतो ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल…!!

आमची मिलेट्री अकौंटमधील नोकरी आता काही दिवसाची राहिली आहे, तेव्हा पुढची भिस्त आपल्यावर रहाणार नसली तरी आपली भिस्त आमच्यावर ठेऊ नये हि माफक अपेक्षा…!! प्रेमं जरुर करा, पण सोबत अर्थार्जन पण हवे….!!! प्रेमाने मंडईत भाजी फुकट मिळत नाही कि वाण्याकडुन किराणा माल…!! अधिक काही बोलत नाही ,आपण सुज्ञ असाल किवा आहात अशी आशा करतो…??? आपल्या लग्नानंतर आपणास आमच्या घरात रहायचे असल्यास लिव लायसन्स चे अॅग्रीमेंट बनवण्यात येईल. सोबत वीजपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येईल….!!! जेवण मातोश्रींना बनवण्यास लावलेत तर त्याचा आकार त्या त्या वेळी लावण्यात येईल व ती रोख स्वरूपात वसुल केली जाईल….!!!

अगदी थोडक्यात आणि मोजकेच सांगायचे झाल्यास लवकर कामाला लागा…..!!

आपला जन्मदाता

पुरुषोत्तम खवचट

तर कसे वाटले तुम्हाला हे पत्र? आवडल्यास नक्की शेअर करावे….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

उन्हापासून संरक्षण तब्येतीला जपण्यासाठी १६ उपाय

स्टिफन हॉकिंग: एका तत्व चिंतकाचा शेवट…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.