विदेशातील नोकरी धुडकावत माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी बनली आर्मी ऑफिसर, डॉक्टर ते कॅप्टन डॉक्टर श्रेयसी निशंक प्रवास

0
विदेशातील नोकरी धुडकावत माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी बनली आर्मी ऑफिसर, डॉक्टर ते कॅप्टन डॉक्टर श्रेयसी निशंक प्रवास

आपण नेहमी म्हणत असतो की राजकारणी नेत्यांची मुले कधी सैन्यात जात नाहीत, राजकारणात देशसेवेसाठी आल्याचा दिखावा करतात पण स्वतःची मुले काही लढायला पाठवत नाहीत. पण आता याला श्रेयसी निशंक एक अपवाद झाली आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि हरिद्वारचे खासदार डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कन्या डॉ. श्रेयसी निशंक ही कॅप्टन आर्मी मेडिकल कॉर्प्स मध्ये सामील झाली आहे. डॉ. श्रेयसी निशंक आता मिलिटरी हॉस्पिटल रुरकीमध्ये आपली सेवा देणार आहे. मिलिटरी हॉस्पिटल ऑडिटोरियम येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तिचे वडील खासदार रमेश निशंक आणि सैन्य अधिकारी यांनी श्रेयसीला एक स्टार लावून कॅप्टन म्हणून सन्मानित केले. या प्रसंगी कॅप्टन डॉ. श्रेयसी म्हणाली की तिने आपल्या वडिलांनी लिहिलेल्या कविता गात हे यश संपादन केले.

या गाण्यांनीच तिला देशाची सेवा करण्यास प्रेरित केल्याचे श्रेयसी म्हणाली. खासदार निशंक म्हणाले की त्यांना त्यांच्या मुलीचा गर्व आहे.

श्रेयसीने जॉलीग्रॅन्ट (ऋषिकेश) येथून एमबीबीएस पूर्ण केलेले आहे. यानंतर तिने उच्चशिक्षणासाठी मॉरिशस विद्यापीठात प्रवेश घेतला. सैन्यात सामील झालेल्या आपल्या मुलीबद्दल बोलताना खासदार डॉ. निशंक म्हणाले की त्यांना अभिमान आहे की श्रेयसी आमच्या घरातील सैन्यात भरती होणारी पहिली व्यक्ती आहे. ते म्हणाले की माझी इच्छा होती की कुटुंबातील कोणीतरी सैन्यात जावे आणि माझी ही इच्छा माझ्या मुलीने पूर्ण केली. खासदार निशंक यांनी सांगितले की त्यांची कन्या श्रेयसी लहानपणापासून डॉक्टर बनू इच्छित होती, परंतु सुमारे दोन वर्षांपूर्वी तिने लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले की, मी आता खुप आनंदी आहे की आता श्रेयसी आर्मीमध्ये आपली सेवा देत देशसेवा करणार आहे.

त्यांनी ही आनंदाची माहिती ट्विटर वर सांगताना स्त्री शिक्षणसंबंधी जागृतीचा संदेश दिला.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी: पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, First Indian Lady Doctor Anandibai Gopalrao Joshi

कोंडाजी फर्जंद: फर्जंद चित्रपटातील मुख्य पात्र फर्जंद कोण होता? पन्हाळगड लढाई कशी झाली

फेसबुक डाटा: फेसबुक ला तुमच्याबद्दल काय काय माहीत आहे? फेसबुक कडे असलेली तुमची माहिती कशी मिळवाल?

LEAVE A REPLY