जेव्हा भाजपचे गिरीश बापट विरोधी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतात

0
जेव्हा भाजपचे गिरीश बापट विरोधी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतात

काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षांनी भाजप सरकारच्या विरोधात रणनीती निश्चित करण्यासाठी आणि आघाडीबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला भाजपचे मंत्री गिरीश बापट प्रकट झाल्याने सारेजण आश्चर्यचकित झाले.

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रालय शेजारील शासकीय निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांची आघाडीबाबत आणि सरकार विरोधात रणनीती करण्यासाठी बैठक सुरू होती. अचानक पुण्याचे पालकमंत्री अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट या बैठकीला उपस्थित झाले. याचा निरोप त्यांनी आधीच सचिवमार्फत दिला होता. बैठक आटोपल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बापट यांनी भेट घेतली. मुलाच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण घेऊन बापट आले होते.

सर्वजण एकत्र भेटले असल्याने या बैठकीला येऊन निमंत्रण दिल्याचे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.
परंतु बापट यांच्या अशा भेटीने चर्चेला उधाण आले हे नक्की नुकतेच बापट यांनी २०१९ ला सरकार येईल का नाही जे सांगता येत नाही असे विधान करून गोंधळ उडवून दिला होता.

गिरीश बापट यांना वास्तवाची जाण, त्यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करते: सुप्रिया सुळे यांचा टोला

बघुयात राजकीय पटलावर खऱ्या अर्थाने काय घडामोडी घडतायेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Deepika Padukone Bold and Beautiful Look | Vogue India Photoshoot

ट्वीटर वर मराठी म्हणी चा जागर #म्हणी

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Mystery

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.