मैत्रीण | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
मैत्रीण | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मैत्रीण

कोणीतरी हवीच असते आपल्याला आपली हक्काची एक मैत्रीण. जी आपल सगळ ऐकून घेईल. कधी आपण दुख सांगितल तर आपल्यावर हसेल आणि त्याच्या दुप्पट समजावून सांगेल. आपल्याला हासवेल. आनंदाची गोष्ट सांगितली तर लहान मुली सारखी खुश होऊन आपल्या सुखात न सांगता सहभागी होईल. कित्येक आपल्या प्रश्नांना ती उत्तर देईल तिला माहित असेल तर नाही तर कुणाला विचारून सांगेल आपण आपल्याला कधी नाराज करणार नाही. अशी मैत्रीण हवी असते.

मैत्रीण अशी हि हवी असते. जिच्यात आणि आपल्यात एक खर नात असाव मैत्रीच ? नाही त्याहून जास्त. कळतय का मी कसल नात म्हणतोय ? हा तेच प्रियसीच. कारण तितके जवळचे असतो आपण. तिला समजून घेत असतो आपण आणि तिला ते कळत असत. बहुतेक वेळा तिला हे कळतहि नसत पण तरी आपण तिची काळजी घेत असतो. नकळत आपण तिच्यात आपल प्रेम बघत असतो. आपली प्रियसी हि अशीच असावी असे विचार करताना कधी विचार येतो कि अशीच पेक्षा हीच का असू नये आपली प्रियसी.

पण ती नादान आपली मैत्रीण फक्त मैत्रीण म्हणूनच छान असते. तिच्याशी बोलण्यात जो मोकळेपणा असतो तो कोणासोबत नसतो. तिची बंधन असतात आपल्यावर लादलेली. कुठ जायचं काय खायचं कोणत्या मुलींशी बोलायचं. मुली कशा फसवतात आणि कस हार्ट ब्रेक करतात सगळ सगळ सांगते ती आपल्याला. पुढचे धोके सगळे समजावून सांगत असते. आणि माझ्यासाठी मी एक सुंदर प्रियसी बघावी हे पण तीच सांगते तेव्हा मनाला खूप वेदना हि होतात.

एक मैत्रीण ती आपल सगळ ऐकून घेते आणि आपल्याला समजून घेते बहुतेक आपल्या आई पेक्षा जास्त. कारण या वयात आपले काही विषय काही गोष्टी आपण आईशी बोलू शकत नाही. मुली बोलतात पण मुल नाही. अशात तीच एक असते जी आपल्याला समजून घेते.

माझी एक मैत्रीण आहे अगदी अशीच. सुंदर, गोड, बालिश, समजूतदार आणि मी काय बोलणार अजून तिला वाचताना कळेल मी कोणासाठी लिहिलंय हे……..

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

बायको: विचारा तिला छान आहे की…

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं

मी म्हणतो का कराव प्रेम

LEAVE A REPLY