History of PUNE: पुण्याचा इतिहास
पुन्नक, पुनवडी ते पुणे हा प्रवास हजारो वर्षांचा आहे. जसजसे दिवस गेले तसतसा पुण्याचा इतिहास (History of Pune) वाढत गेला.

History of PUNE
सन 754 : पुण्याचे नाव होते ‘पुन्नक’.
सन 993 : ‘पुनवडी’ हे पुण्याचे नाव पडले.
सन 1600 : मूळच्या वस्तीला ‘कसबा पुणे’ हे नाव होते.
शहाजी भोसले यास पुणे व सुपे यांच्या भोवतालचा प्रदेश मिळाला. त्या वेळी ते गाव कसबा पुणे म्हणून ओळखले जाई. आताची कसबा पेठ म्हणजे जुने पुणे होय.
सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली – सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.
पुणे हे शिवाजीमहाराजांच्या जीवनपटातील व मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा जिजाबाई व शिवाजीमहाराज पुण्यास वास्तव्यास आले तेव्हापासून पुण्याच्या इतिहासातील एक नवे पर्व जन्माला आले. शिवाजीमहाराज व जिजामाता पुण्यातील लाल महाल येथे राहत असत. पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपतीची स्थापना जिजाबाईंनी केली.
सन 1663 : मंगळवार पेठ वसली.
सन 1703 : बुधवार पेठ वसली.
History of PUNE from Peshwa Rule
सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.
सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू.
सन 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.
सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली.
पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची ‘प्रशासकीय राजधानी’ बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.
सन 1749 : पर्वतीवरील देवालय बांधले.
सन 1750 : वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.
सन 1755 : नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले.
सन 1756 : गणेश व नारायण पेठा वसवल्या.
सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.
सन 1669 : सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या.
सन 1774 : नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या.
सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.
सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थापना.
सन 1856 : पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाला.
सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.
सन 1869 : सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित.
सन 1875 : संगम (वेलस्ली) पूल वाहतुकीस खुला.
सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण.
सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.
सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.
सन 1885 : फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना.
सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.
सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.
सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.
सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.
सन 1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.
सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे बांधकाम.
सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.
सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू.
सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.
सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.
सन 1961 : पानशेत धरण फुटले.
सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.
Pune Old Photos
शिवाजी पूल: बांधकाम चालू असताना भांडारकर इन्स्टिट्यूट शिवाजी पूल ससून इस्पितळ कृषी विद्यापीठ तेव्हाचे डेक्कन कात्रज घाट COEP शिवाजी पूल उद्घाटन पाताळेश्वर पुणे स्टेशन हुतात्मा स्मारक पानशेत पूर पर्वती तळ घाशीराम कोतवाल वाडा शनिवार वाडा पानशेत तळ
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पुण्यातील नेत्यांनी व समाजसुधारकांनी महत्त्वाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक आणि वि.दा. सावरकर या नेत्यांमुळे पुण्याने राजकीय पटलावर आपले अनन्यसाधारण महत्व राखले. महादेव गोविंद रानडे, रा.गो. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा फुले हे समाजसुधारक व राष्ट्रीय ख्यातीचे नेते पुण्याचा इतिहास History of Pune उंचावत गेले.
मराठा साम्राज्याची राजधानी ते सांस्कृतिक राजधानी अशा अनेक नावांनी पुणे प्रसिद्ध होत आले आहे.
सर्वांना ही माहिती कळावी यासाठी नक्की शेअर करा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.