पुण्याला अवैध फ्लेक्स चा विळखा

0
पुण्याला अवैध फ्लेक्स चा विळखा

पुणे मध्ये विधानसभा २०१९ चे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यातच महाजनादेश यात्रा आणि मंत्र्यांचे आगमन यामुळे पुण्यात अवैध फ्लेक्स चे वारे जोरात वाहू लागले आहे. भावी आमदार म्हणत जागोजागी अवैध फ्लेक्स लावलेले दिसत आहेत. सुंदर पुण्याला कुरूप करण्याचा प्रकार यामुळे वाढला आहे.

सध्या या धामधुमीत कोथरूड च्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाने लागलेला फ्लेक्स चांगलाच गाजत आहे. भर रस्त्यात लावलेल्या फ्लेक्स मुळे रुग्णवाहिका अडकली होती. सतर्क पुणेकरांनी रुग्णवाहिकेचा आवाज ऐकल्यानंतर रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा केला खरा परंतु रस्त्याच्या मध्येच आमदार मेधा कुलकर्णी यांच्या फ्लेक्स आडवा आल्याने रुग्णवाहिकेला वाट पाहावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

मेधा कुलकर्णी अवैध फ्लेक्स व्हिडिओ

सतर्क पुणेकर या अवैध फ्लेक्सबाजी ला कंटाळले आहेत. यात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपापले मोठमोठे बॅनर लावून येणाऱ्या निवडणुकीत आपली बाजू भक्कम करण्याचा बेत मांडला आहे. उठसुठ कोणीही उठतो आणि बॅनर लावतो. खांब असो, दिशादर्शक असो प्रत्येक सरकारी वस्तूवर आपलाच अधिकार गाजवत स्वतःचे बॅनर लावणे चालू झाले आहे. अनेक नागरिकांनी यावर तक्रारी केल्या आहेत परंतु यावर किती कारवाई होणार ही वेळच ठरवेल.

अवैध फ्लेक्स नागरिकांच्या तक्रारी

1.

2.

3.

4.

अवैध फ्लेक्स कसे लावले जातात?
चिरीमिरी देऊन थोड्या दिवसांकरता ही बॅनरबाजी केली जाते. परवानगी घेऊन बॅनर लावल्यास मोठा खर्च येतो. रोज लाखो रुपये भाडे द्यावे लागते. परंतु अवैध बॅनर लावल्यास हा खर्च सुद्धा वाचतो आणि कार्य साध्य सुद्धा होते. आता ही चिरीमिरी कोण खाते हे सर्व सुज्ञ पुणेकरांना माहीतच आहे.

या अवैद्य फ्लेक्स विरुद्ध आपणही आवाज उठवा. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार आपण नोंदवू शकता.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Best Misal in PUNE, Famous Misal Pav Hotels in Pune List

भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? हिंदी राष्ट्रभाषा आहे का?

Best Misal in PUNE, Famous Misal Pav Hotels in Pune List

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.