मंगळावर पहिल्यांदा पाऊल टाकणार एक भारतीय महिला

0
मंगळावर पहिल्यांदा पाऊल टाकणार एक भारतीय महिला

भारतीयांची मान गर्वाने उंचावेल अशी एक बातमी नुकतीच आली आहे. “जसलीन कौर जॉसन” ही मंगळ ग्रहावर जाणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे. योगायोग म्हणजे ‘कल्पना चावला’ आणि ‘जसलीन कौर’ या दोघीही हरियाणाच्याच आहेत. जसलीनची निवड संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे.

सर्वात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्तापर्यंत मंगळ ग्रहावर मानवाने पाऊल ठेवलेलं नाही. माणूस प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या भूमीवर पाऊल ठेवेल असं हे पहिलंच मिशन असेल. म्हणून हे मिशन अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. या मिशनला नासाने ‘ओरीयन मिशन’ असं नाव दिलं आहे. यासाठी जगभरातून विविध व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
नासाने या निवडीसाठी “नासा रोवर चॅलेंज काँपीटीशन” नामक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जसलीनने “जेस्को वॉन फुटकमर” पुरस्कार पटकावला आणि तिची निवड ‘मार्स’ मिशनसाठी करण्यात आली. ही निवड दोन वर्षाआधीच करण्यात आली आहे.

नक्की काय असेल या मार्श मिशनमध्ये ??
हे ‘मार्स मिशन’ दोन प्रकारचं असेल. एक तर ‘वन वे मिशन’ आणि दुसरं म्हणजे ‘टू वे मिशन’. वन वे मिशनमध्ये सहभागी अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर परतणार नाहीत, तर टू वे मिशन मधील अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. जसलीन २०३० मध्ये होणाऱ्या टू वे मिशनचा भाग असणार आहे.
जसलीन म्हणते त्याप्रमाणे मंगळावर पोहोचण्यासाठी “नऊ महिन्यांचा प्रवास, तीन महिने तिथे वास्तव्य आणि तिथून परतण्यासाठी आणखी नऊ महिने असा २१ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.”
बापरे !!!

मंडळी, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स आणि आता या यादीत जसलीन कौर हे नवीन नावही सामील झालं आहे. यामुळे देशभरातील मुलींना नक्कीच नवी प्रेरणा मिळेल.
या भारताच्या कन्येला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.