JAWA Showroom in Pune: India’s First JAWA Showroom Inaugurated in Pune

0
JAWA Showroom in Pune: India’s First JAWA Showroom Inaugurated in Pune

९० च्या काळात अनुभवायला मिळणार फटफटी चा अनुभव आता पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. डोळ्यांवर गॉगल,  मिशांना मारलेला ताव, रुबाबदार रांगडा गडी आपल्या ऐटबाज गाडीवर मोठ्या झोकात धडधड आवाज करुन जाण्याचे दिवस आता पुन्हा दिसणार आहेत.

JAWA कंपनीने आपली फटफटी ची बाजारपेठ पुन्हा एकदा सुरु केली आहे. ज्येष्ठ लोकांना आपल्या ऐन उमेदीचे दिवस पुन्हा आठवणार आहेत. तेव्हाच्या तरुणांना त्यांच्या जुन्या दिवसात पुन्हा घेऊन जाण्याचे काम JAWA गाड्या करणार आहे. प्रत्येकाची आवडती बाईक कोणती म्हणले कि जो तो JAWA ची म्हणायचा. तेव्हा बाजारात फक्त आणि फक्त धूम होती ती JAWA Bikes ची.

Jawa Showroom in Pune Pimpri Chinchwad

JAWA Showroom in Pune Pimpri Chinchwad

जावा कंपनीचे पहिले शोरूम आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये सुरु झाले आहे.  एनएसजी जावा ऑटोरायडर (NSG JAWA AUTORIDER)  ही भारतातील पहिली शोरुम पिंपरी चिंचवडमध्ये गावडे इस्टेट येथे सुरु करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शनिवारी NSG JAWA AUTORIDER Pune JAWA Showroom उद्घाटन झाले.  JAWA Company CEO अश्विन जोशी, PCMC महापौर राहुल जाधव, नगरसेवक अमित गावडे आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला.

NSG JAWA AUTORIDER Address: 

Chinchwad: M/s NSG Jawa, Ground Floor, 202, Gawade Estate, Mumbai Pune Highway, Chinchwad Station, Pune – 411109

JAWA Shakti Autimobiles Pune Address:

Opposite Cafe Coffee Day, Pavitra Building, Survey No 288/1, 1st, Baner, Pune, Maharashtra 411045

JAWA Motorcycle Booking Online: Click Here

JAWA Company in India

 

१९६१ साली भारतात जावा कंपनीने पहिली मोटरसायकल आणली.  फटफटी या नावाने जावा लोकांमध्ये प्रसिद्ध होत गेली. परंतु काही तांत्रिक कारणामुळे १९७१ नंतर या गाडीचे उत्पादन बंद करण्यात आले. काही काळानंतर कंपनीने आपली नवीन गाडी येझदी बाजारात दाखल केली आणि कंपनीने पुन्हा एकदा बाजारात आपले स्थान निर्माण केले. आधी जावा च्या गाड्या विदेशातून आणल्या जायच्या परंतु नंतर त्या म्हैसूर येथील कारखान्यात तयार केल्या जात होत्या. त्याकाळी फक्त आणि फक्त जावा गाड्याच बाजारात होत्या. वजन, सांभाळायला अवघड गाडी असल्याने अनेकजण लांबूनच या गाडीकडे पाहायचे. परंतु बाजारात दुसऱ्या गाड्या हळूहळू प्रवेश करू लागल्या आणि जावा चा खप कमी व्हायला लागला. त्यामुळे जावाने आपल्या गाड्यांची निर्मिती बंद केली.

परंतु महिंद्रा  धरून जावा कंपनी भारतात पुन्हा एकदा आपली पाळेमुळे रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. नव्या रंगात आई नव्या ढंगात गाडी बाजारात दाखल केली आहे. JAWA Classic आणि JAWA 42 या गाड्या त्यांनी बाजारात दाखल केल्या आहेत. भारतातील First JAWA Showroom चिंचवड येथे सुरु झाले आहे.

©PuneriSpeaks

अशाच अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि  टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठा जातीचा दाखला कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया

Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी !

शिवाजी महाराज व त्यांच्या आई ….

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.