संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी घटनेने महाराष्ट्राला एक नवे वळण दिले. आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला लोक घाबरत नाहीत. एक अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गेला. मोठमोठे मोर्चे निघाले. महाराष्ट्राला एक शांततामय मोर्चाच्या रूपाने “मराठा क्रांती मोर्चा” मिळाला.
महाराष्ट्राची निर्भया जिने या सर्व अत्याचाराला सामोरे जात महाराष्ट्राला संघर्ष करण्यास शिकवले तिच्यावर हा प्रसंग कसा ओढवला गेला…..
१७ जुलै २०१६ ची सायंकाळ….
अल्पवयीन पीडित मुलीला बरं वाटतं नसल्यामुळे ती त्या दिवशी शाळेत गेली नाही. दिवसभर घरात होती. आणि तिचे कुटुंबिय शेतात कामासाठी गेले होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास घरातले परत आल्यावर आईने तिला आजीकडून तिखट आणण्यास पाठवले. मी तिखट आणायला जाते पण तू चहा बनवून ठेवं असं सांगून ती आजीकडे निघून गेली.
सायकलवरून पीडित मुलगी आजीकडे गेली. तेव्हा आजी भाकरी करत होती. भाकरी करून तिखट देते असं सांगितल्यावर तिने उत्तर दिलं की, उशिर झाला तर मला भीति वाटेल म्हणून तू लवकरच तिखट दे. असं सांगून तिने तिखट घेतलं. त्यानंतर तिने तिखट घेतलं. आणि आजोबांनी तिला अंड आवडतं म्हणून एक अंड हातात दिलं आणि ती निघाले.
बराच वेळ घरी आली नाही म्हणून पीडित मुलीच्या आईने आजोबांकडे फोन केला. त्यांचा फोन लागला नाही म्हणून आई स्वतः आली. नातं कधीच गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुलीची शोधाशोध सुरू झाली. तिचा मावस भाऊ तिला शोधण्यास निघाला तेव्हा त्याला रस्त्यात तिची सायकल पडलेली सापडली. सायकल सोडून ती अशी जाणार नाही म्हणून भावाने शोधाशोध केली.
तेव्हा पीडित मुलगी त्याला जंगलात पडलेली दिसली. त्यानंतर त्या मावस भावाच्या मागोमाग त्या मुलीची आई आणि बहिण देखील आले होते. त्यांनी पीडित मुलीला अगदी चुकीच्या अवस्थेत बघितलं आणि त्यांच मनच हेलावून गेलं. मावसभावाने आरोपींना पळताना पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. त्या आरोपींना पोलिसांनी नंतर अटक केली. केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालु झाली.
या अत्याचारावरून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ‘मराठा मूक क्रांती मोर्चे’ निघाले. संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगात क्रांतीची मशाल पेटवली गेली.
या घटनेला तब्बल दीड वर्ष उलटून गेले…तरीही त्या ताईवर झालेल्या अत्याचाराच्या जखमा अजूनही शिळ्या झाल्या नाहीत. धगधगता ज्वाला अजूनही लोकांच्या मनात फुलत आहे.