प्रत पत्र: छत्रपती सिवाजी राजे यांस | अजिंक्य भोसले

0
प्रत पत्र: छत्रपती सिवाजी राजे यांस | अजिंक्य भोसले

प्रत पत्र: छत्रपती सिवाजी राजे यांस,

पत्र काही कारणास्तवच लिहावे असा काही नियम नाही. म्हणून या पत्रास हि काही विशेष कारण नाही. बस तुमची याद आल्याने काहीतरी चार शब्द मनापासून लिहून तुम्हास पाठवत आहोत. बाकी तुमच्या वेळेनुसार हि माझी शब्द रचना वाचावी. दिवसांमाग दिवस जात आलेत महाराज आणि या दिवसांच्या सोबत इंग्रजी महिना मार्च संपत आलाय. अजून तीन महिन्यांनी शिवशक ३४५ सुरु होईल पण. मार्च संपत आलाय आणि आता एप्रिल येईल. तुमचा महानिर्वाण दिन येईल. एक भारत जिंकण्याच स्वप्न घेऊन जगणारा बहाद्दूर राजा अचानक लोकांना काही न सांगता सगळ सोडून निघून जातो. जगाला पोरका करतो. यात काहीतरी गैर वाटत होत मला आणि अजून हि वाटतच. तुमचा मृत्यू नैसर्गिक असण किंवा कोणत्या आजाराने होण अशक्यच आहे.

पण मग तुम्ही गेल्यानंतर सारवासारव करायला गुडगी दुखीच्या त्रासाचा बहाणा जगासमोर पेश करून वातावरण निवळण्यात काहींना यश आल. पण ७ मार्च ला रायगडास येऊन राजाराम राजेंचा लग्न सोहळा पार करूनहि तुम्ही ठीक वाटत होता. पण २२ मार्चच्या दुपार पासून तुम्हास रक्ताच्या उलट्या झाल्या. कशामुळे ? विषामुळे. विष इतक भिणल इतक भिणल कि बारा दिवसात म्हणजे ३ एप्रिलच्या पक्का वेळ प्रहर माहित नाही पण तुमच्या श्वासांना नाकावाटे बाहेर पडल्यावर पुन्हा आत प्रवेश मिळाला नाही. पण मग कोण होते ते लोक ज्यांनी हा कट रचला आणि त्यात ते यशस्वी झाले. असो. जास्त लिहावयास गेलो तर. तुमचेच मावळे जे चोवीस तास तुमच्या नावाचा जप करत असतात ते मलाच उलट सवाल करतात. म्हणून नेमके आणि जास्त काही बोलू शकत नाही मी. आणि मी बोलू तरी कसा राजे. मी पत्र लिहितोय. तुम्हाला जाब विचारात नाही.

पण आज आठवण आली तुमची. सकाळी गणपती सोबत तुमची पूजा करताना आठवण झाली मला. म्हंटल आज राजेंशी संवाद साधावा. उत्तराची अपेक्षा नाही, माहितीय मला तुम्ही अखंड माझ्यासोबत आहात. पण महाराज काळजी वाटते मला तुमची. इतरानंही वाटत असेल. आणि वाटते. पण मला माझ्या आई सारखी तुमची काळजी वाटते. अस वाटते सतत तुमची विचारपूस करावी. खाल्ल का काय ? काही त्रास होतोय का ? समाजात चालेलेल्या तुमच्या नावाच्या राजकारणात तुम्हला कुठे तुम्ही गुन्हेगार वाटत का ? तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारावी वाटते सतत. बाकी कसे आहात ? बर वाटतय का ? काळजी घ्या. पहिलेच बोललो तस पत्रास काहीच कारण नाही. बस तुमची आठवण आली. म्हणून चार शब्द लिहिले.

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

जिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले

इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज | अजिंक्य भोसले

शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात

LEAVE A REPLY