जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्कूटर ला DSP चा मुलगा ऑडी ने ठोकतो !

0
जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्कूटर ला DSP चा मुलगा ऑडी ने ठोकतो !

Manohar Parrikar Scooter Accident Story: संरक्षणमंत्री होण्याअगोदर मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळची ही घटना…

CM Manohar Parrikar Scooter Accident Story, When Audi Driver DSP Son hit Manohar Parrikar Scooter

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे नेहमी आपल्या स्कूटर वर मंत्रालयात जायचे. एकदां साधी राहणी अशी ओळख मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची होती. आपल्या स्कूटर वर हेल्मेट घालून ते पणजी मध्ये फेरफटका मारत मंत्रालयात पोहचत असत. बाकी मुख्यमंत्र्यांसारखा डौलदार पणा पर्रीकर यांच्या कधीच नव्हता. उच्च शिक्षीत असलेल्या मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना साधे राहणीमान आवडत असत.

Manohar Parrikar great Politician

त्यासाठी ते प्रसिद्ध सुद्धा होते. अचानकपणे साध्या हॉटेल मध्ये जेवायला जाणे, सामान्य लोकांसारखे स्कूटर वर फेरफटका मारणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच होते. मतदान केंद्रावर मतदान करायला गेल्यावर सामान्य लोकांसारखे रांगेत उभे राहून मनोहर पर्रीकर मतदान करायचे.

Manohar Parrikar Simple Life Eating at hotel

अशावेळी मनोहर पर्रीकर यांचा एक साधेपणा दाखवणारी एक घटना घडली.

मनोहर पर्रीकर सकाळसकाळी नेहमीप्रमाणे आपल्या स्कूटर वर चालले होते. सकाळी वर्दळ कमी होती, परंतु सिग्नल चालूच होते. अचानक मागून वेगाने ऑडी कार चालवणाऱ्या एका मुलाला मनोहर पर्रीकर सिग्नल वर थांबतील असे वाटले नाही. परंतु शिस्तप्रिय पर्रीकर हे सिग्नल वर थांबले. अचानकपणे थांबलेल्या स्कूटर मुळे ऑडी चालक भांबावला. जोरात ब्रेक दाबत कशीबशी गाडी थांबवली. मोठ्या अहिर्भाव दाखवत ऑडी चालवणारा मुलगा मनोहर पर्रीकर यांना रागात म्हणाला ‘कुठे रस्त्यातच थांबलायस, बाजुला हो’, “तुला माहीत नाही का मी कोण आहे, माझा बाप DSP आहे”. परंतु शांत आणि साधी राहणी असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी आपले हेल्मेट काढत त्या मुलाला म्हणाले की “मग तुझ्या बापूस जाऊन सांग तुला मुख्यमंत्री भेटला होता ते” “अरे, गाडी हळू चालवत जा” असा सल्ला देत नम्रपणे उत्तर दिले. चक्क मुख्यमंत्री असून सुद्धा  नम्रपणे त्या मुलाला समजून सांगितले. तर अशी घडली होती Manohar Parrikar Scooter Accident घटना.

अशाच छोटछोट्या घटना लोकांची पारख करत असते. अशा एका नेत्याला भारत मुकला आहे. माजी संरक्षणमंत्री, गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना समस्त PuneriSpeaks टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली??

Real story of Manohar Parrikar, Manohar Parrikar Simple Life, Manohar Parrikar Aam Aadmi Life

हा लेख आवडल्यास Whatsapp, Facebook, Twitter वर नक्की शेअर करा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

आधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे?

Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी !

कोंडाजी फर्जंद: फर्जंद चित्रपटातील मुख्य पात्र फर्जंद कोण होता? पन्हाळगड लढाई कशी झाली

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.