मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरूनच प्रवेश देण्याच्या सूचना: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

0
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरूनच प्रवेश देण्याच्या सूचना: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

सरकारच्या नवीन धोरणानुसार आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मे प्रवेश शुल्क भरून विद्यालयात प्रवेश देण्याबाबत विद्यालयांना सुचना दिल्या आहेत असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

यामुळे निम्मे प्रवेशशुल्क भरून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे सोप्पे होणार आहे.
निम्मे शुल्क सरकार स्वतः भरणार असून प्रवेश नाकारणाऱ्या विद्यालयांवर सरकार कारवाई करणार असल्याचे चंद्रकांत पाटील बोलले. मराठा क्रांती मोर्चा च्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यामार्फत सुरू झालेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील उद्योजकांना १० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज राज्य शासन भरेल. परंतु पहिल्या महिन्यात व्याज व मुद्दलाचा बोजा पडणार असल्यामुळे त्यांचे पहिल्या महिन्याचे कर्जावरील व्याज व मुद्दलाची रक्कम बँकेत भरण्यात येईल. दुसऱ्या महिन्यापासून व्याजाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात महामंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

राहुल फटांगडे च्या खुनाचा व्हिडिओ प्रसिद्ध, समाजकंठकांकडून निर्घृणपणे खून

पावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी

मी कार्यकर्ता: साहेबांचा कार्यकर्ता

 

LEAVE A REPLY