मराठी भाषा पंधरवडा ला ट्विटर वर सुरुवात
मराठी भाषा पंधरवडा #भाषांतरदिंडी: गूगल भाषांतर दिंडी चा उद्देश:
आंतरजालावर मराठी भाषेचे अस्तित्व असणे आणि ती दिवसेंदिवस समृद्ध होत जाणे, यामागे आपल्यापैकीच अनेकांनी दिलेल्या योगदानाची पार्श्वभूमी आहे. कारण ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’. या विचारांनी वाढत्या स्पर्धेच्या काळात आपल्या मायमराठी भाषेच्या समृद्धीचा वेग वाढावा, याच अनुषंगाने मराठीभाषेची व तिच्या समृद्धीस असलेल्या अनेक सेवांची अधिकाधिक जनजागृती व्हावी, हा ‘गूगल भाषांतर दिंडी’मागचा उद्देश आहे.
१ जानेवारी ते १५ जानेवारी २०१८ पर्यंत म्हणजे नव्या वर्षातील तब्बल दोन आठवडे म्हणजेच पहिला पंधरवडा ‘मराठी भाषा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे.
‘मराठी भाषा पंधरवडा’ सुरू होतोय आजपासून.
यानिमित्ताने आपला #भाषांतरदिंडी
उपक्रमाचा श्रीगणेशा होत आहे.आपण सर्वांनी शक्य असेल तसे रोज किमान दहा मिनिटे तरी यात सहभाग घेतलात तरी आपले एक लाख शब्द/वाक्य भाषांतरित करण्याचे लक्ष्य सहज पूर्ण होऊ शकेल.
तर मग, बघताय काय? सामील व्हा! pic.twitter.com/a9lGkaIubX
— मराठी रिट्विट (@MarathiRT) January 1, 2018
शासकीय ते शाळास्तरांपर्यंत या पंधरवड्यात अनेक उपक्रम आपापल्या परीने राबविले जातात, जसं की ग्रंथदिंडी, व्याख्यान, निबंधमाला, शुद्धलेखन स्पर्धा, प्रदर्शन, वादविवाद स्पर्धा आयोजन आणखी बरंच काही…
तर सांगायचा मुद्दा हा की, ट्विटरवर मराठी भाषेसाठी काम करणारे @MarathiWord म्हणजेच आजचा शब्द आणि मराठी रिट्विट @MarathiRT हे आपले जे मित्र आहेत. ते यंदाचा ‘मराठी भाषा पंधरवडा‘निमित्त एक उपक्रम राबवत आहेत.
हा उपक्रम सोशल मीडियावर आवडीने मराठी लिहिणाऱ्या व वाचणाऱ्या आपल्या मराठीप्रेमी मित्रांसाठी आहे. ज्यात आपल्या सर्वांना आणि जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट होऊन भाषांतराचे योगदान द्यायचे आहे.
यात गूगलतर्फे भाषांतराची जी सेवा जगभरातल्या भाषा समृद्ध करण्यासाठी वापरली जाते, त्यात मराठी भाषेत भाषांतर करण्याची सोय उपलब्ध आहे.
आज इंटरनेटवर मराठी भाषेत योगदान देणारे अनेक समूह आहेत, जे आपापल्यापरीने नेहमीच योगदान देत असतात, परंतु मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने आपल्यालाही येते 15 दिवस योगदान देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे.
सहभागी होण्याची प्रक्रिया:
या उपक्रमात तुम्हाला मोबाईल, संगणक जिथून शक्य असेल तिथून सहभागी होऊ शकता.
जर मोबाईलवर असाल तर तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधून प्ले स्टोअर आणि आयफोन असेल तर अॅपस्टोअरमध्ये जायचंय आणि गूगलचं क्राऊडसोर्स (Google crowdsource) हे अॅप शोधायचं आहे आणि स्थापित(install) करायचं आहे.
क्राऊडसोर्स अनुप्रयोग –
Google Crowdsource
अॅप इन्स्टॉल झाल्यावर गूगल खात्याने लॉग इन आपोआप होईलच, नाही झाल्यास तुम्हाला तुमच्या गूगल खात्याने लॉग इन करायचं आहे, आणि पुढे इंग्रजी हा डिफॉल्ट पर्याय असेल त्या सोबत मराठी भाषेची निवड करायची आहे.
अॅप सेट केल्यावर अनेक पर्यायांपैकी ट्रान्सलेशन/भाषांतर आणि ट्रान्सलेशन व्हॅलीडेशन पर्याय आपल्याला महत्वाचे आहेत.
यापैकी ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला एक इंग्रजी वाक्य मिळेल, त्या इंग्रजी वाक्याला तुम्हाला समजलेल्या आणि सुचत असलेल्या अचूक मराठी भाषेत टाईप करुन आणि तपासून ते सबमिट करायचं आहे. एक भाषांतर सबमिट केल्यावर तुम्हाला पुढचं वाक्य दिलं जातं. असे करत अनेक वाक्य व शब्द आपण भाषांतरित करत जातो.
दुसऱ्या पर्यायात म्हणजे ‘ट्रान्सलेशन व्हॅलीडेशन’मध्ये तुम्हाला एका इंग्रजी वाक्याचे 2 किंवा 4 पर्यायी आपल्यापैकीच याआधी अनेकांनी करुन ठेवलेल्या भाषांतराचेच मराठी वाक्य दिली जातात आणि त्याच्यापुढे आपल्याला चूक/बरोबर किंवा होय/नाही असे पर्याय दिले जातात.. जर तुम्हाला ते भाषांतर योग्य वाटत असेल तर तुम्ही होय निवडू शकता आणि जर भाषांतर चूकीचे वाटत असेल तर तुम्ही ते नाही असं निवडून पुढे जाण्याचा पर्याय (Submit) दाबू शकता.
असं करत, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलेशन व्हॅलीडेशन या दोन्ही पर्यायांमध्ये आपल्याला येणारे पुढचे 15 दिवस किमान 150 शब्द/वाक्यांचं योगदान देण्याचा प्रयत्न करायचा आहे.
१ लाख शब्दांचे लक्ष:
येत्या 15 दिवसात आपल्याला एकत्र मिळून किमान एक लाख शब्द/वाक्यांचं योगदान द्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्त जर आपण करु शकलो तर अतिशय उत्तम होईलच, नाहीच तर किमान एक लाखाचा पल्ला गाठायचा आहेच.
भाषांतर उपक्रम करण्याचा फायदा असा की गूगलतर्फे यात प्रत्येक भाषांतराला एक गुण दिला जातो, यात ठराविक गुणांना लेव्हल वाढत जाते. आणि जितके जास्त गुण असतील तितक्या लवकर आपल्या भाषांतराचे व्हॅलीडेशन गूगलतर्फे करुन वापरात आणले जाते.
माय मराठीचा झेंडा अटकेपार नेऊयात:
हा मायमराठी साठी काहीतरी करूयात या दृष्टिकोनातून @MarathiWord आणि @MarathiRT सोबत आपणही सारे या अभिनव उपक्रमाचा भाग होऊयात आणि इंटरनेट/आंतरजालावर आपल्या योगदानाद्वारे दिवसेंदिवस अचूक होत जाणाऱ्या मायमराठीचा झेंडा आपण सगळेच मिळून ‘अटकेपार’ नेऊयात.
मराठीसाठी एकी करून मराठीला नेट च्या जगात पुढे न्हेउन ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण केलेल्या भाषांतराचा फोटो आपण #भाषांतरदिंडी या टॅग खाली ट्विटर वर टाकून बाकीच्यांना प्रेरित करण्याचे काम करू शकता.
भाषांतर दिंडीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
#भाषांतरदिंडी
आपल्या #मराठी #भाषांतरदिंडी साठी माझी पण सुरूवात झाली आहे येत्या पंधरा दिवसात कमीत कमी २५०० चा टप्पा गाठायचा आहे तेवढाच माझा खारीचा वाटा.✌ pic.twitter.com/GqbW02aVds
— ❀SHRUTI❀ (@sns_shruti) December 31, 2017
#भाषांतरदिंडी
सज्ज व्हा !! सज्ज व्हा !!सज्ज व्हा !!#भाषांतरदिंडी उद्यापासून …
काय आहे भाषांतर दिंडी जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये :https://t.co/1wQlwmF6ZZ@MarathiRT @MarathiWord— Marathi Vlogger (@JeevanKadamVlog) December 31, 2017
#भाषांतरदिंडी
मंडळी, #भाषांतरदिंडी मध्ये दिलेल्या योगदानाची आकडेवारी या गुगल फॉर्ममध्ये नमूद करायला विसरू नका.
फॉर्म: https://t.co/mvobMg6UEr pic.twitter.com/CGvJgAPPE7
— मराठी रिट्विट (@MarathiRT) January 1, 2018
#भाषांतरदिंडी
आज पासुन सुरुवात केली माझा पण माय मराठी साठी खारीचा वाटा ? pic.twitter.com/6WQDZUoTa6
— Kunal (@Kunal39172724) December 29, 2017
#भाषांतरदिंडी
मी कालच सुरुवात केली. प्रवासात असतानाच अनेक शब्द आणि वाक्यांचं भाषांतर केलं. आजही काम संपले की रात्री सहभागी होईनच. तुम्हीही व्हाच! #भाषांतरदिंडी https://t.co/G7euxZy2of
— Tulsidas Bhoite (@TulsidasBhoite) January 1, 2018
#भाषांतरदिंडी
वारकरी जशी पंढरी गाठतात, तसेच काहीसे#भाषांतरदिंडी चे आजपासून 15 दिवस ही #virtual #मराठी दिंडी ची पालखी खाली ठेवावी वाटत नाही, विठ्ठलाचे नामस्मरण जसे अखंड असते तसे चालू ठेवावे हे काम, करुण घेईलच बाप्पा शेवटी, सुरुवात केली आहे बघू कुठवर टप्पा जतोय. #म@MarathiRT @MarathiWord pic.twitter.com/sx0RUmjSUD
— vinit vaidya (@hifrom_vinit) January 1, 2018
#भाषांतरदिंडी
मराठी भाषा पंधरवड्याच्या हार्दिक शुभेच्छा !!#भाषांतरदिंडी चा आज पहिला दिवस.
तुमचं योगदान खालील फॉर्म मध्ये नोंदवा :
दुवा : https://t.co/Z1oEJIh5TU pic.twitter.com/JQ3u0Xxjs5
— आजचा शब्द ! (@MarathiWord) January 1, 2018
#भाषांतरदिंडी
याय लागतय कुठ यायचचं माझ्या मराठीसाठी आपल्या मराठीसाठी #भाषांतरदिंडी
— Vinayak Sable (@vinayaksable4) January 2, 2018
#भाषांतरदिंडी
#भाषांतरदिंडी आजपासून सुरू झालेल्या मराठी भाषा पंधरवाड्यात माझं योगदान @MarathiWord @MarathiRT pic.twitter.com/b9v2NjWvzK
— मेघराज पाटील (@MeghRaajPatil) January 1, 2018
#भाषांतरदिंडी
चला मी पण सहभागी झालो आहे #भाषांतरदिंडी मध्ये आपणही सहभागी व्हा आणि यात आपला मोलाचा वाटा द्या..?☺️ pic.twitter.com/jYEpNYwHhH
— Devaa? (@devendrajoshi64) December 31, 2017
#भाषांतरदिंडी
१००० हस्ताक्षर टाईप करून झाली #म #भाषांतरदिंडी pic.twitter.com/5WqEPdRMWk
— एकला (@AkataAkala) December 28, 2017
#भाषांतरदिंडी
#भाषांतरदिंडी या संख्येच्या दुप्पट भाषांतरे करायचा प्लॅन आहे. pic.twitter.com/CTGLPkt0fs
— सुशील (@hpsonar) December 25, 2017
#भाषांतरदिंडी
#भाषांतरदिंडी
चला मी पण सहभागी झालो आहे #भाषांतरदिंडी मध्ये आपणही सहभागी व्हा आणि यात आपला मोलाचा वाटा द्या..?☺️ pic.twitter.com/VMkOjCAzKc— Sanjay Tingare (@TingareSanjay) January 1, 2018
चला सर्वजण मिळून ‘मराठी भाषा पंधरवडा‘ मध्ये सहभागी होऊन आपापले योगदान देऊयात…
@MarathiRT @MarathiWord @PuneriSpeaks
साभार: @MarathiRT
©PuneriSpeaks
[…] दिंडी २०१८ ब्लॉग पोस्ट २ – दत्ता गूगल भाषांतर दिंडी २०१८ ब्लॉग पोस्ट ३ – पुणेरी स्पीक्स गूगल भाषांतर […]