निमित्त मराठी राजभाषा दिनाच #मराठीभाषादिन #अभिजातमराठी

1
निमित्त मराठी राजभाषा दिनाच #मराठीभाषादिन #अभिजातमराठी

निमित्त मराठी राजभाषा दिनाच

मराठी हि भाषा आहे, हा एक संवाद आहे, त्याच्यावर हे एक नात आहे जन्मापासून ते मरेपर्यंत. मेल्यानंतरही श्राद्धाच्या विधी-संवादापार्यंत. मराठी ही कुणाची हक्काची भाषा नाही. मराठी बोलावच अशी कोणाला सक्ती नाही. मराठी येते , जमते, कळते आणि जाणून हि घेता येते. अ-आ-इ-ई या सोप्प्या शब्दांसारखी सोप्पी भाषा आहे. तशीच इंग्लिश, हिब्रू, उर्दू भाषेसारखी अवघड आणि तितकीच उच्च आहे.

आपण मराठी आहे जातीने का भाषेने हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मला एक वाटत कोण महार कोण चांभार कोण माळी शिंपी कोणी मराठा ही जात असेलही पण त्याची भाषा ही मराठीच आहे. हे लक्षात असाव. आंबेडकर–फुले–लहूजी-शिवाजी महाराज साहेब वाटून घेताना त्यांची जात बघितली. त्यांच्या कार्याला बघून आपली जात आपण वाटून घेतली. पण यात कित्येक वर्ष माणूस हा समाज विसरून गेलाय कि जात वेगळी असली तरी आपल रक्त हे लाल आहे. आणि हे लाल रक्त जस सारख एकसमान आहे तशीच आपली भाषाही एकसमान मराठीच आहे.

अभिजात भाषा दर्जा

कोण बोलत नाही इंग्लिश घरात, कोण बोलत नाही हिंदी, कुणाला समजत नाही कन्नड-तमिळ आणि कोण विसरू शकत नाही आपली मराठी. ज्या मराठीचे गोडवे साऱ्या जगात गायले जातात. ज्या मराठी भाषेला जगातल्या सर्वोत्तम भाषेत पंधराव स्थान आहे ज्या मराठीचा इतिहास हा बाहेरच्या भाषेपेक्षा अमर आहे त्या मराठीला आपण आउटडेटेड मानतो, का?

इंग्रजांची सत्ता स्थापन झाली इथे. त्यांनी आपली भाषा सोडून हिंदी मराठी कन्नड शिकली. जिथे त्यांना विरोध होत होता अशा अवस्थेत त्यांनी शिवाजी महाराजांची चित्र भिंतींवर लाऊन मराठी सैनिक भरती केली. असा हा महान राजा मराठीच होता. आणि अशा या महान मराठी महाराजाच कर्तुत्व-कार्य-स्वराज्य सर्व इथेच आहे तेही मराठी. ज्या वेळी भारतात उर्दू मुसलमानी हिंदी (अफगाणिस्तान-इराक), पोर्तुगीज आणि डच, संस्कृत अशा भाषा होत्या तेव्हा महाराजांनी शब्दकोश बनवून घेऊन काही नवीन शब्द आणि जुने शब्द एका कोशात बंदिस्त करून या भेसळयुक्त भाषेला स्वतंत्र केल. त्याच मराठी भाषेला जगात मानाचा दर्जा आहे पण या महाराष्ट्रात? काडीची हि किंमत नाही. भाषा तितकीच महत्वाची जितकी एका नुकत्याच निपजलेल्या बाळाला आईची.

पण इथल अर्थकारण-राजकारण-लोकशाही-व्यवहार-उद्योगधंदे-जातिवाद-दंगली-आणि बरच काही जे जे चालत ते मराठीतूनच संवाद साधून एकमेकांपर्यंत पोचवल जात आणि त्यातून सोडवल जात.

मग या अशा अमर छ. शिवाजी महाराजांनी शुद्ध केलेल्या मराठी भाषेला मानाचा दर्जा का नाही? हा प्रश्न मला सतत पडतो. तुम्हाला इग्लिश येत असेल तर तुम्ही फार शिकलेले. तुमचे मित्र-मंडळी यांची संख्या जास्त असते. पुण्या मुंबईच्या ठिकाणी मुलाखत हि इंग्लिश मधून घेतली जाते ऑफिस मध्ये हिंदी बोलली जाते. पण तिथले सगळेच जण घरी गेल्यावर आपल्या आईशी, बायकोशी, मुलांशी अगदी प्रियकर-प्रेयसीशी हि बोलताना संवाद साधताना मराठीतूनच बोलतात. हॉटेलमध्ये “I have one cold coffee and one latte” म्हणणारी तरुण पिढी एकटी असताना एका छोट्या गाड्यावर म्हणते “काका एक कटिंग द्या हो.”

वेळेनुसार भाषा वापरून आपणच आपल्या मराठीचा अपमान करत आहोत. “thanks ,thank you so much” म्हणताना छान आणि सोयीस्कर वाटत असेल पण कधी तरी धन्यवाद म्हणायला लागा खूप बर वाटेल. तुम्हाला हि आणि पुढच्या मराठी-अमराठी माणसाला हि. भाषा कळावी लागते अस काही नाही. इंग्लिश तरी कुठ आपली भाषा आहे पण बघून वाचून समजतेच न आपल्याला बोलतोच तोडक मोडक. तसच आपली मराठी ज्यांना जमत नाही त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलण्याचा आपला अट्टाहास का असतो ? पाणीपुरीवाला भेळवाला उडपी यांच्याशी बोलताना उगीचच तोडक-मोडक हिंदीत बोलायचं पण आधी जाणून घ्याना ती व्यक्ती इथ व्यवसाय करते ती वेडी म्हणून ती इथ आली आहे का? त्यांना भाषा कळत नसती तर ते इथ पोट भरू शकले असते का? पण नाही कोण विचार करत नाही. त्यांच्याशी मराठीत बोलल तर अगदी मस्त गप्पा मारतात आपल्याशी एकही शब्द न अडखळता आणि तुम्ही बोला हिंदीतून त्यांच्याशी किंवा त्यांच्या बिहारी कन्नड तमिळ भाषेतून तुम्हाला नाही जमणार.

बाकी आंबेडकर-फुले-शिवजी महाराज साहेब हे पण मराठीच होते. आणि त्यांनी त्याचं काम त्याच भाषेतून केल. मग स्वताला जर आपल्या जातीशी एकनिष्ठ समजता तर मग त्या जातीच्या महापुरुषांच कार्य बघा मराठीतून-वाचा मराठीतून आणि ते दुसर्यांना हि सांगा मराठीतूनच….

|| मराठी राजभाषा दिनाचा विजय असो | मराठी भाषेचा विजय असो | मराठी भाषेला शुद्ध करणाऱ्या छ.शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा | आणि मराठीतून आपल अमर कार्य करणाऱ्या सबंध महापुरुष आणि साधू संतांना अभिवादन ||
#अभिजातमराठी

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? #अभिजातमराठी |

पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला

नोकरी म्हणजे एक मरतुकडी गाय…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.