#ट्विटरसंमेलन : आजपासुन ट्विटर वर मराठीचा जागर

4
#ट्विटरसंमेलन : आजपासुन ट्विटर वर मराठीचा जागर

आजपासुन ट्विटर वर #ट्विटरसंमेलन आयोजित केले असुन १६, १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी सर्व ट्विटरवासी मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी एक पाऊल टाकत आहेत.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एक छोटासा प्रयत्न मराठी ट्विटरवासी #ट्विटरसंमेलन या हॅशटॅग खाली करीत आहेत.
मराठी साहित्य संमेलन पार्श्वभूमीवर #ट्विटरसंमेलन ची सुरुवात @MarathiWord या ट्विटर खात्याने केली. रोज लाखो मराठी ट्विट्स केल्या जाव्यात या उद्देशाखाली हे संमेलन भरवले जात आहे.

#मराठीशाळा #बोलतोमराठी #भटकंती #माझीकथा #माझीकविता #माझाछंद #माझाब्लाॅग #खमंग #वाचनीय #माझीबोली #साहित्यसंमेलन #हायटेकमराठी

बारा हॅशटॅग मित्र” वरील १२ हॅशटॅग वापरून तुम्हाला ट्विट करायचे आहेत. थोडक्यात तुम्हाला ट्विट करताना दोन हॅश टॅग वापरायचे आहेत, मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आणि सोबत बारा हॅश टॅग पैकी एक हॅशटॅग.

मराठी भाषेचा प्रसार करण्यात अग्रभागी असणारे अनेक ट्विटर खाते या संमेलनात सहभागी झाले आहेत.

#ट्विटरसंमेलन

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

तर तुम्ही सहभागी झालात का?
चला आपली मराठी संस्कृती जपुयात…
आपली ट्विट्स आम्हाला ट्विटर वर @PuneriSpeaks वर पाठवू शकता, आम्ही आपले ट्विट आमच्या वेबसाइट वर प्रकाशित करू.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

ट्वीटर वर मराठी म्हणी चा जागर #म्हणी

मराठी भाषा पंधरवडा ला ट्विटर वर सुरुवात

मराठीच्या जतनासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्याची गरज. केरळ, कर्नाटक, TN भाषा संवर्धनात महाराष्ट्राच्या पुढे : भाषा अभ्यास समिती

 1. *एक मार्मिक ऊपदेश*

  *कात्रीला पायापाशी आणि सुईला डोक्यातील टोपीवर ठेवतात असे का?*
  ========================

  *एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले “बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो. म्हणूनच……*
  *जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा, कैचीसारखे तोडण्याचे नाही.*

  🙏 *जीवनाचा खरा अर्थ* 🙏
  🌸🌸बोधकथा.

LEAVE A REPLY