मराठी म्हणी लहानपणी तुम्ही सर्वांनी खूपवेळा ऐकल्या असतील, नाचता येईना अंगण वाकडे… अडला हरी, गाढवाचे पाय धरी .. पण काळ गेला आणि हळूहळू मराठी म्हणी चा पाया थोडा ढिला पडायला लागल्याचे वाटू लागले आहे. आपण आपल्या मुलांना मराठी म्हणी शिकवण्याऐवजी English गाणी पाठ करायला लावत जगाच्या स्पर्धेत उतरवत आहोत. आपल्या मराठी म्हणी पुन्हा एकदा वाढाव्यात आणि सर्वांच्या तोंडी याव्यात यासाठी @Marathi_Vishwa हे ट्वीटर खाते #म्हणी या Tagline अंतर्गत मराठी म्हणींना एक उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपल्या मराठी मध्ये एक म्हण आहे.., हे वाक्य बरेचदा आपण दिनचर्येत वापरतो.. तर येऊदेत आपल्या दिनचर्येत वापरल्या जाणाऱ्या मराठमोळ्या म्हणींना #म्हणी वर. pic.twitter.com/Gcc58hk85y
— महाराष्ट्र – माझेगाव (@Marathi_Vishwa) February 4, 2018
तर चला पाहूयात मराठी म्हणी #म्हणी
1.
तोंड करी बाता आणि ढुंगण खाई लाथा#म्हणी #पुणे
— Puneri Speaks™ (@PuneriSpeaks) February 5, 2018
2.
६)कावळ्यांच्या शापाने गायगुरं मरत नाहीत.
८)गाढवपुढं वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
९)गाढवाला गुळाची चव काय?
१०)गुळाचा गणपती,गुळाचा नैवेद्य.#म्हणी #मराठी— @_वि_शा_ल_@ (@vishaljagtap__) February 4, 2018
3.
महाराष्ट्राच्या परिस्थितीचा अनुभव देणारी एक म्हण.
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.#म्हणी #म #मराठी— Mayur Lambe (@imayurendra) February 4, 2018
4.
१५ वर्षांच्या नवसाने मुल झालं…..
……आणि मुके घेऊन मेलं.#मराठी #म्हणी
— किशोर भाऊ (@kishor_ub) February 4, 2018
5.
नाव ठेवी लोकाला अन् शेंबूड आपल्या नाकाला?#म्हणी
— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) February 4, 2018
6.
आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी #म्हणी
— कृष्णा मुळीक (@Krushna_Mk) February 4, 2018
7.
#म्हणी
ढवळ्या शेजारी पवळा बांधला…!!#वाण नाही पण #गुण लागला…!!@Marathi_Vishwa— Pinu_bhau (@shinde_pinu) February 4, 2018
#म्हणी
दुसर्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही…!!— Pinu_bhau (@shinde_pinu) February 4, 2018
8.
एका id वरून ओव्या अन दुसऱ्या id वरून शिव्या? #म्हणी #टेक्नोम्हणी
— Nana (@madanegopal) February 4, 2018
9.
#म्हणी
आपला तो बाबू …आणि दुसऱ्याच ते कार्ट..!— Vinod Bhalerao’z (@vinodbhalerao44) February 4, 2018
10.
उंटावरून शेळ्या हाकणे
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
कोल्हा काकडीला राजी
गाढवाला गुळाची चव काय
घोडा मैदान जवळ असणे
डोंगर पोखरून उंदीर काढणे.
भरंवशाच्या म्हशीला टोणगा
वरातीमागून घोडे
पाण्यात राहून माशाशी वैर #मराठी #म्हणी प्राण्यांवर .— Mayur Lambe (@imayurendra) February 4, 2018
11.
#म्हणी
लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण— प1 Rede (@pavanrede93) February 4, 2018
12.
1】अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
2】ओठात एक आणि पोटात एक.
3】आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
#मराठी #म्हणी— नाशिककर™? (@praveengavit) February 4, 2018
13.
डोंगर पोखरुन उंदीर काढला.#मराठी #म्हणी
— #Taimur fan ? (@Digamber) February 4, 2018
14.
चमकणारे सर्व सोने असते असे नाही.#म्हणी
— Laxmi Ramesh jadhav (@LaxmiRameshjad1) February 5, 2018
15.
‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव……’ #म्हणी
— सोनल (@scbambal) February 5, 2018
तर कशा वाटल्या मराठी म्हणी….. आम्हाला नक्की कळवा..
आवडल्यास नक्की शेअर करा….
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर #खूनीसरकार हॅशटॅग वर लोकांनी विचारला सरकारला जाब
ekadam kaddak bhuau