गाजीपुर प्रकरण: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मौलवी ला अटक

0
गाजीपुर प्रकरण: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मौलवी ला अटक

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी गाजीपुर प्रकरण मध्ये गाजीपुरमधील मदरसा च्या मौलवी ला अटक केली असून, २१ एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणातील अल्पवयीन मुख्य आरोपीला अटक केली होती.

पूर्व दिल्लीतील दहा वर्षांच्या मुलीला मदरशामध्ये बंद करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

मुलीच्या आई वडिलांनी असा दावाही केला आहे की मदरशाचे धर्मगुरू म्हणजेच मौलवी यांना अल्पवयीन मुलीला कैद केल्याची माहिती होती. मुलीच्या कुटुंबाने मौलवीच्या अटकेसाठी राष्ट्रीय महामार्ग 24 बंद पडत कॅन्डललाइट मार्चचे आयोजन केले होते. त्यानंतर मौलवी ला अटक करण्यात आली आहे.

गाजीपुर प्रकरण

21 एप्रिल रोजी एका पित्याने आपली मुलगी बेपत्ता असल्याने पूर्व दिल्लीतील गाजीपुर पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि आपल्या दहा वर्षाची मुलगी बाजारपेठेत गेल्यापासून परत आली नसल्याची तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी ताबडतोब चौकशी सुरू केली आणि एक सीसीटीव्ही फुटेज सापडला ज्यामध्ये एक किशोरवयीन मुलगा त्यांच्या मुलीला घेऊन जाताना दिसत होता. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला शोधून काढत त्याच्यावर नजर ठेवत अल्पवयीन मुलीला गाझियाबाद येथील नीलमनी कॉलनीतील मदरशामधून मुलीची सुटका केली आणि मुलाला अटक करण्यात आली. मुलीच्या वैद्यकीय तपासणीवरून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

लोकशाही नसती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या: छत्रपती उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY