MDH मसाल्यांचा बादशाह महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची अफवा

0
MDH मसाल्यांचा बादशाह महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची अफवा

मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले एमडीएच मसाचे कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज निधन झाले आहे अशी बातमी सर्व न्युज वाल्यांनी दिली होती.

नवी दिल्ली येथील एका खासगी रूग्णालयात त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असे बातमीत दाखवले गेले. परंतु ते स्वस्थ असल्याचे त्यांचे जावई सुभाष शर्मा यांनी सांगितले आहे. त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवली गेल्याचे त्यांनी सांगितले.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा पाकिस्तानमधील सियालकोट येथे जन्म झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीमध्ये मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला होता. जगभरात MDH मसाले हा एक ब्रँड बनला आहे.

MDH Masala Owner Information

Mahashay DharamPal Gulati rare photos

MDH long form ‘महाशियां दी हट्टी’. गुलाटी यांचे कष्ट आणि जाहिरातबाजीमुळे ‘MDH’ कंपनी मसाले बाजारात एका वेगळ्या स्थरावर जाऊन पोहचले आहेत. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या असताना MDH ने मसाल्यांच्या जगात आपले पाय खोलवर रोवले आहेत. १००० च्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं असून अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत MDH मसाल्यांची विक्री होते. MDH Masala Owner महाशय धर्मपाल गुलाटी यांनी १५०० रुपयांत सुरु केलेला हा व्यवसाय आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल करतोय. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा मुलगा राजीव गुलाटी हे आता या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

तनुश्री दत्ता चा नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप

पुणे कालवा दुर्घटना : धाडसी महिला कॉन्स्टेबल कोण?

25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.