महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर 22 फौजदारी खटले दाखल असुन त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे, २२ पैकी तीन गंभीर गुन्हेगारी खटले त्यांच्यावर दाखल आहेत.
केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्यावर 11 गुन्हेगारी खटल्यांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 10 गुन्हेगारी खटल्यांनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तथापि, गंभीर गुन्हेगारी खटले असलेल्या मुख्यमंत्री यादीत केजरीवाल चार प्रकरणांसह प्रथम क्रमांकावर आहेत.
देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने आपला अहवाल सादर करताना ही माहिती दिली आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? तो व्हिडिओ कोणत्या चित्रपटातला?