“आई म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ” नका टाकू तिला अशी एकटी

0
“आई म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ” नका टाकू तिला अशी एकटी

आई म्हणजे काय हे कोणाला सांगायला लागत नाही, पण आपण जसजसे मोठे होत गेलो तसे आई नावाचे रूप तसेच राहिले पण आपले रूप बदलत गेले

हीच व्यथा मांडणारी ही कविता…….

“जास्त नको काहीतरी द्या पोटा पुरते..

पोरगा माझा शिकलाय, मस्त मोठा झालाय..
पण आता त्यालाही माझा खूप कंटाळा आलाय..

म्हणतो आई किती ग घाण वाटतेस..
मित्रांसमोर येऊन अशी मलाच का लाज आणतेस..

मजा करायला पैसा खूप पण माझ्यासाठी नाही..
कधी तरी औषध आणेल याच आशेने प्रत्येक दिवस जाई..

लहान होता तेव्हा हाताच्या फोडासारखं जपलं..
मोठा होईल शिकून म्हणून सगळं काही विकलं..

आता राहते फिरत अशी, फुटपाथ वरच झोपते..
कोणी टाकलेल्या अन्नावरच पोट मग थोडं भरते..

तूला पण असेल ना रे आई, तुझी काळजी करणारी?
स्वतः उपाशी राहून पोट तुझं भरणारी..

नको देऊ तिला अंतर किती मोठा झालास तरी..
तुझ्याच प्रेमाच्या सावलीत जगू दे तिला जाण्याआधी देवाघरी…”

 

खरोखरच डोळ्यातून पाणी आले वाचुन😢

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

पटले तर नक्की share करा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi | PuneriSpeaks

LEAVE A REPLY