स्पर्धा परिक्षार्थींचे राज्यभर तीव्र आंदोलन, आंदोलकांच्या मागण्या

0
स्पर्धा परिक्षार्थींचे राज्यभर तीव्र आंदोलन, आंदोलकांच्या मागण्या

स्पर्धा परिक्षार्थींचे राज्यभर तीव्र आंदोलन

गेल्या तीन वर्षात नोकर भरतीवर बंदी आणून सरकारने बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या वाढवली असून सरकार नोकरीविरोधी धोरण राबवत आहे.

त्याचे उग्र पडसाद गुरुवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या रूपात संपूर्ण राज्यभर उमटले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे, नागपूरसह राज्यातील विविध भागांत आंदोलन करत ‍सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.

राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जवळपास दीड ते दोन लाख उमेदवार अर्ज करतात परंतु यावर्षी ६९ जागाच निघाल्याने उमेदवार नाराज आहेत. दिवसरात्र अभ्यास करून ६९ जागांसाठी लाखो विद्यार्थ्यांना झगडावे लागल्याने बेरोजगारी वाढत असल्याचे स्पष्ट आहे. उमेदवारांनी यावर आवाज उठवत आंदोलन छेडले.

आंदोलकांच्या मागण्या?

  • पदभरतीच्या जाहिरातीत सर्वच पदांचा सुरूवातीपासून समावेश करावा
  • राज्यसेवा परीक्षेसाठी उमेदवारांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात यावी
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे सी-सॅटची परीक्षा पात्रतेपुरती ठेवण्यात यावी
  • सरळ सेवेतील ३० टक्के कपातीचा निर्णय शासनाने मागे घ्यावा
  • पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी
  • राज्यसेवा परीक्षांच्या संख्येत वाढ करा
  • एमपीएससीची संयुक्त परीक्षा रद्द करा
  • परीक्षांसाठी बायोमॅट्रिक हजेरी घ्या
  • परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचा: मराठी बातम्या
तुकाराम मुंडे वाद: पुण्याने एक ध्येयवादी अधिकारी गमावला, तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली

जेव्हा भाजपचे गिरीश बापट विरोधी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतात

LEAVE A REPLY