चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

चंद्र: ग्रहण मांग समाजाचे

रात्रीचा लाल चंद्र पांढरा लख्ख पडला. आकाशाकडील नजरा पुऱ्या-पुऱ्या खाली आल्या. साडे नऊ नंतर सगळ्यांच्या घरातून चपात्यांचा वास, कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येऊ लागला. (ज्यांनी ग्रहण पाळल होत त्यांच्या घरातल हे वर्णन आहे. पण तस बघायला गेल तर सात पासून चौपाटीवर खवय्यांची तुंबळ गर्दी जमलेली. असो)

तर अस सगळ चालले असताना चंद्राला लोक विसरली. आणि पुन्हा जेवण झाल्यावर चंद्राच्या ग्रहणावर अगदी नासा-इस्त्रोच्या संशोधकांसारखे काही बोलत होते. जे दिसलं नाही ते पण बोलत होते. ज्यांनी बघितल नाही ते पण बोलत होते. हे ग्रहण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे माहित नसलेले पण या विषयावर गप्पा मारत होते. अशात अंदाजे दहाच्या सुमारास रस्ता तसा सामसूम होता. त्यात आवाज आला.

ग्रहान झाल. …….कायतर द्या……….यां. माई….ग्रहान झाल…यां.

मी दार उघडून बाहेर गेलो. असा आवाज मी आजवर पहिल्यांदाच ऐकलेला, उत्सुकता होती. म्हणून मी गेलो. काही मांग समाजाच्या बायका (वयस्कर आणि चाळीशीतल्या) खांद्यावर पिशव्या घेऊन ओरडत चालल्या होत्या. प्रत्येकाच्या दारावरून जात होत्या पण कुणाच दार वाजवून काही मागत नव्हत्या. स्वेच्छेने कुणी आपल्याला अन्न, धान्य, पैसे, कपडे द्यावे. असा त्याचं बहुदा प्रण होता.
अस म्हणतात (मानतात) फार पूर्वी दारोदारी हे मांग लोक ग्रहणाच्या समाप्ती नंतर दारोदारी भिक्षा मागायला जात. मुळात ती कल्पना अशी बनली की,
ग्रहणाच्या काळात पृथ्वीवरील वातावरण फार दुषित बनत. त्यामुळे सकाळी बनवलेलं जेवण साठवलेलं पाणी असेल तरी ते दुषित बनत. (घाण नाही, त्यातले ऑक्सिजन प्रमाण कमी होऊन घातक घटक तयार होतात) आणि अस अन्न, पाणी खाल्ल्याने आपल्याला ते पचायला त्रास होतो कारण तेव्हा आपल्या पोटाची पचवण्याची ताकदही कमकुवत बनते. म्हणून अशा दिवसाच साठवलेलं अन्न-धान्य लोक टाकून देत.
म्हणून तेव्हाच्या लोकांनी या विशिष्ठ दिवसाला आपल्या उपजीविकेचा एक स्त्रोत बनवला. काळाप्रमाणे बदल झाला. अंधश्रद्धे नंतर विज्ञान आल. आणि विज्ञानान ही मान्य केल कि ग्रहणाचा तो काळ दुषितच असतो. तर अन्न, धान्य, मग कुणी पैसे, कुणी कपडे देऊ लागले. आणि हे मांग या गोष्टी घेत राहिले. या दिवशी मांग लोकांना काही दान केल्यास आपल चांगल होत अशी प्रथा रूढ झाली.

त्यांनतर आजवर हि प्रथा सुरु आहे. बघून खूप बर वाटल. छ.शिवाजी महाराजांच्या आधी पासून हि प्रथा सुरु असल्याच समजल आहे.

हे काय नवीन नाही. विज्ञान आत्ताच आहे. श्रद्धा–अंधश्रद्धा जुनीच आहे. कितीही अंधश्रद्धेला आत्ता नाव ठेवली जात असली तरी हीच श्रद्धा विज्ञानाचा पाया आहे.
देव नावाच्या अंधश्रद्धेला शोधता-शोधता विज्ञान इतक प्रगत झाल पण देवापर्यंत पोहचू नाही शकल. पण माणसाच्या याच श्रद्धेने म्हणा किंवा अंधश्रद्धेने म्हणा माणूस जातिने देवाला अनुभवलं आहे. आणि यातूनच काही रूढी परंपरा इथेच स्थित झाल्या.
अशी हि प्रथा विज्ञान नसताना हि जन्माला आली आणि आजवर निपजली आहे. याच मला कौतुक वाटल. त्या बायकांकडे बघून……..

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.