शिवरायांचे गडदुर्ग स्वच्छ राखणारा एक दुर्गप्रेमी

0
शिवरायांचे गडदुर्ग स्वच्छ राखणारा एक दुर्गप्रेमी

गडदुर्ग स्वच्छ राखणारा एक वेडा ..

आजकाल कोणत्याही गड-किल्ल्यावर गेल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसतो तो कचऱ्याचा ढीग….

Photo Credit's

सर्वत्र पसरलेले प्लॅस्टिक चे कागद, बाटल्या किल्यांच्या सुंदरतेला काळिमा फासतात….

अशाच किल्यांचे सौंदर्य राखण्याचे काम एक दुर्गप्रेमी कित्येक दिवस करत आहे,

राजगडावर भेटलेला एक शिवभक्त….

जेमतेम 26-27(?) वर्षाचा असेल..

कपाळाला चंद्रकोर,कानात मोत्यांची कर्णकुंडले…

महाराजा सारखी थोडी फार दिसणारी दाढी मिशी..साधी राहाणी पणपायात चप्पल नाही अनवाणीच..राहणारा मुळचा तुळजापुरचा.पण त्याचा पत्ता तिथे कमी तर जास्त गडकोट किल्ल्यांवर….त्याला एकच ध्यास महारांजांचे गडकोट किल्ले स्वच्छ ठेवायचे..साफ सफाई करायची..किल्ल्यावर चालणार्या वाईट क्रृत्याला आवर घालायचा..हे सगळ करताना त्याला तहान भुकेची परवा नसते..पायात चप्पल नाही घालत का तर माझ्या धाकल्या धनींनी जे दुःख अनुभवल त्याची झळ मला पोहचावी यासाठी…किती हे महारांजांवरील प्रेम आदर..आपण फक्त महारांजांचे विचार वाचतो पण अवलंब करत नाही पण ह्या व्यक्ती कडे पाहुन खरचं अस वाटेल की काय हे राजांवरील प्रेम..दिवस रात्र अनवाणी किल्लावर फिरण कचरा गोळा करण ही खरचं सोपी गोष्ट नाही.किल्यांवर मज्जा मस्तीच करण्याच प्रमाण जास्तच वाढल आहे..आपला हया गणेश दादाला मदतीचा हातभार म्हणुन जेव्हा गडावर जाल तेव्हा कचरा न करता उलटपक्षी गडावरचा कचरा तरी ऊचलु…एवढ तरी आपण करुच शकतो ना??ही पोस्ट जास्ती जास्त शेअर करा कदाचित त्याच्या ह्या सुंदर कार्याची दखल शासन घेईल..हि माहिती संपुर्ण खात्री करून पोस्ट करत आहोत ..

Source – मी एक दुर्गप्रेमी.

LEAVE A REPLY