हिरव्या रंगासमोर मोदींचाही रंग टिकणार नाही – असदुद्दीन ओवैसी

0
हिरव्या रंगासमोर मोदींचाही रंग टिकणार नाही – असदुद्दीन ओवैसी

Asaduddin owaisi | Narendra modi | Rahul gandhi

आमच्या हिरव्या रंगासमोर ना नरेंद्र मोदींचा रंग टिकेल ना काँग्रेसचा. आमच्या हिरव्या रंगासमोर कोणीही तग धरु शकत नाही, असे विधान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काल एका सभेत केले आहे. आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करु तेव्हा सगळे हिरवेच होईल आणि हिरव्याखाली सगळे झाकून जाईल असेही ते म्हणाले.

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी वादग्रस्त विधान केले. तुम्ही काहीही करा, पण आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करु, त्यावेळी सगळीकडे फक्त हिरवा आणि हिरवाच रंग दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी गुजरात प्रचाराच्या वेळी घेतलेल्या मंदिर दर्शनावर सुद्धा त्यांनी टीका केली, ते म्हणाले की राहुल गांधींना मशीद नाहीत आठवली का? भाजपा आणि काँग्रेस मतांचे राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.

या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसी ची ट्विटर वर खिल्ली उडवली गेली हे सांगायला लागु नये🤣

आपले यावर काय मत आहे आम्हाला नक्की कळवा…
@PuneriSpeaks

LEAVE A REPLY