पानिपत ची तिसरे युद्ध मराठा साम्राज्य सेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाले.
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे दिल्लीच्या उत्तरेस सुमारे ९७ किमी अंतरावर उत्तरेत, मराठा साम्राज्याच्या एका उत्तरी मोहीम दरम्यान या युद्धाचा सुरुंग पेटला.
हे युद्ध अफगाणिस्तानचा अब्दाली आणि नजीब–उद-दौला यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीची पातशाही टिकवण्यासाठी मराठ्यांबरोबर झाले. ही लढाई 18 व्या शतकात लढलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाच्या युद्ध घटनांपैकी एक मानली जाते.
पानिपत तिसरे युद्ध सैन्य संख्या

दुराणी सैन्य संख्या:
४२,००० घोडदळ
४३,००० पायदळ
१०,००० राखीव
४,००० वैयक्तिक रक्षक
तोफांच्या 120-130 तुकड्या
संपूर्ण सैन्य 100,000
मराठा
२०,००० घोडदळ
१५,००० पायदळ
१५,००० पिंडारी
२०० तोफा .
या सैन्यापाशी २,००,००० (यात्रेकरू आणि अनुयायी)
संपूर्ण सैन्य ५०,००० ते ७०,०००
पानिपत युद्ध नुकसान
दुराणी सैन्य हानी
अंदाजे २०,००० ते ३०,००० लढाऊ मृत
मराठा सैन्य हानी
युद्धामध्ये ३०,००० ते ४०,००० लढाऊ लोक मारले गेले लढाईनंतर आणखी ४०,००० – ७०,००० लोकांना कैद करून मारण्यात आले.

अहमद शाह दुराणी यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने मराठा तुकड्यावर वर्चस्व प्रस्थापित करत विजय मिळवला. सुजाचा दिवाण काशीराजच्या बखरीनुसार युद्धानंतरच्या दुसऱ्या दिवशी सुमारे ४०,००० मराठा कैद्यांना मारले गेले.
मराठ्यांचा इतिहास ही कादंबरी ग्रँट डफ यांनी हत्याकांडातून जिवंत वाचलेल्या लोकांच्या मुलाखतीतुन बनवली असुन त्यात सुद्धा एकूण १,००,००० मराठा युद्धकाळात मारले गेल्याचे लिहिलेले वाचायला मिळते.
पानिपत आधीचे मराठा साम्राज्य
बाजीराव पेशवे यांच्या काळात, गुजरात, माळवा आणि राजपुताना भाग मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला. अखेरीस, १७३७ मध्ये, बाजीरावांनी दिल्लीच्या बाहेरील मोगलांचा पराभव करत दिल्लीच्या दक्षिणेकडील मुघल प्रदेशांचे बरेचसे भाग आपल्या ताब्यात घेतले. १७५८ मध्ये पंजाबवर आक्रमण करून बाजीराव यांचा मुलगा बालाजी बाजीराव पेशवे म्हणजेच नानासाहेब यांनी मराठ्यांच्या ताब्यात असलेला प्रदेश लाहोर पर्यंतच्या सीमेवर वाढवत नेला. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला हा शब्दप्रयोग यावरून प्रचलित आला. मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीच्या दुराणी साम्राज्यांशी प्रत्यक्षपणे पंगा घेतला. १७५९ मध्ये अब्दालीने पश्तून आणि बलूच जमातींमधून एक सैन्य उभे केले आणि पंजाबातील लहान मराठा चौक्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ते आपल्या भारतीय सहयोगींसह रोहिल्ला अफगाणांसोबत मराठ्यांविरुद्ध व्यापक युती करत मराठ्यापुढे येऊन उभे ठाकले.
पानिपत लढाई स्वारी
सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी ४५,००० ते ६०,००० दरम्यान सैन्य एकत्र केले. सुमारे २,००,००० यात्रेकरूंचा भार सांभाळत भाऊंनी उत्तरेत कूच केली. त्यातील बहुतेक यात्रेकरू ते उत्तर भारतात हिंदू पवित्र स्थळांच्या यात्रेसाठी उत्सुक होते. हेच यात्रेकरूंचे ओझे पानिपत युद्धात मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले.

भाऊंनी उत्तरेत कूच करत आपल्या सैन्यानिशी दिल्लीवर हल्ला करत दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. परंतु यमुनेला पुर असल्याने अब्दाली आणि।मराठा सैन्य एकमेकांचा सामना करू शकत नव्हते. त्यात दिल्ली कायमच्या लुटमारीमुळे भकास झाली होती. त्यामुळे मराठ्यांचा उपवास व्हायला लागला. भाऊंनी यावर उपाय काढत आपला तळ कुंजपुरा जिंकण्यासाठी हलवला. आपल्या कुशाग्र बुद्धी आणि तोफांच्या सोबतीने मराठ्यांनी कुंजपुरा आरामात जिंकला. परंतु इकडे अब्दालीच्या सैन्याने यमुनेला ओलांडले. अब्दाली ला लढा देण्यासाठी भाऊंनी माघारी वळत आपला तळ पानिपत मध्ये वळवत तिथेच ठाण मांडुन बचावात्मक पवित्रा घेऊन थांबले.
परंतु पानिपत मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे आणि रसद पुरवठा खंडामुळे सैन्याचा उपास घडु लागला. त्यात मराठ्यांची प्रचंड हानी झाली. अखेर लढाईचा पवित्रा घेत पेशवा सेनापती भाऊंनी पानिपत लढाईचा शंख फुंकला.
पानिपत लढाई सुरुवात

सदाशिवरावरावभाऊ पेशवे यांनी आपले सरदार मल्हारराव होळकर यांनी उजवी बाजु त्याबाजुला शिंदे सरदार आणि मध्यभागी पेशवे सैनिक अशी मांडणी करत डाव्या बाजुला दमाजी, विठ्ठल शिवदेव, यशवंत पवार व अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या लावल्या. डाव्या बाजूची कमान इब्राहिम गारदी यांनी तोफा आणि जंबुरा च्या साहाय्याने सांभाळली. सैन्याच्या पाठोपाठ यात्रेकरू आणि खाशे मंडळी होती.
इब्राहिम गारदी ने आपली मर्दुमकी दाखवत अब्दाली च्या सैन्याला खिंडार पाडले.

दुपारपर्यंत मराठ्यांनी आपली पकड मजबुत ठेवत लढाईत वर्चस्व मिळवले होते. परंतु कित्येक दिवस भुकेने व्याकुळलेले सैन्य कोलमडू लागले. त्यात काही सरदारांनी उतावळेपणा करीत ठरलेल्या योजनेविरुद्ध पाऊले टाकत नामुष्की ओढवून घेतली.
अखेरच्या टप्प्यात मराठ्यांच्या शिंदे तुकडीने नजीब वर हल्ला केला. नजीब यशस्वीरित्या एक बचावात्मक लढा देत राहिला. अफगाण सैन्याची डावी तुकडी अभेद्य राहत मध्यभागी भाऊंनी अफगाण सैन्याला भगदाड पाडले. उजवीकडचे सैन्य जवळजवळ नष्ट झाले होते.

अहमद शाह अब्दाली आपल्या तंबूतून युद्ध पाहत होता, त्याच्या डाव्या बाजूला अजूनही अखंड संरक्षण उभे होते. अब्दाली ने दुपारनंतर आपली राखीव फौज बाहेर काढत दमलेल्या मराठा सैनिकांना दमछाक करून टाकले.
पानिपत लढाई चा शेवट
सदाशिवराव भाऊ यांनी आपली मधील बाजु ढासळताना दिसत असल्याने आणि विश्वासराव लढाईत गायब झाल्याने त्यांनी हत्तीवरून उतरून स्वतः मैदानावर लढू लागले.

विश्वासराव आधीच डोक्यावर गोळी लागून मृत्युमुखी पडले होते. विश्वासरावांच्या पडण्याने मराठा सैन्य गळून पडले, तरीही भाऊ आणि त्यांचे निष्ठावंत अंगरक्षक अखेरीपर्यंत लढा देत राहिले. भाऊंनी आपले युद्धकौशल्य दाखवत अनेक अफगाणांना गारद करत युद्धभूमीत जीव सोडला. याआधीच एक बाजु सांभाळणाऱ्या होळकर यांना युद्धाच्या परिणामांची जाणीव झाली आणि त्यांनी त्यातून पळ काढत आपले सैन्य वाचवले. अखेर मराठ्यांचा या लढाईत पराभव झाला.
मल्हारराव होळकर यांनी जवळपास १५,००० सैनिक घेत ग्वाल्हेर गाठले. त्यात सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वती यांना वाचवण्यात ते यशस्वी झाले.
पानिपत लढाई नंतरचा नरसंहार
अफगाण घोडदळ व पायदळाने पानिपत च्या परिसरात फिरून वाचलेल्या मराठा सैनिक व नागरिकांना शोधून ठार मारले. पानिपत मध्ये आश्रय घेणार्या महिला आणि मुलांना गुलाम बनवून अफगाण छावणीत डांबून ठेवले. १४ वय पूर्ण असलेल्या मुलांचा त्यांच्या स्वत:च्या माता-भगिनींच्या समोर शिरच्छेद केला. युद्धात मरण पावलेल्या अफगाणिस्तानच्या सैनिकांना पानिपत आणि आसपासच्या परिसरात पुढील दिवशी वाचलेल्या मराठ्यांची कत्तली करण्याची अनुमती देण्यात आली. सुजा-उद-दौला चा दिवाण काशीराज यांच्या बखरीनुसार युद्धानंतरच्या दिवशी सुमारे ४०,००० मराठा कैद्यांची कत्तल करण्यात आली.
पानिपत नंतरचे मराठा साम्राज्य
पेशवे बालाजी बाजीराव, यांना सैन्याच्या अवस्थेबाबत माहिती नसल्याने, त्यांनी पराभवाच्या वेळी नर्मदा ओलांडली होती. परंतु विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते न सावरता पुण्याला माघारी परतले. सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूने ते पूर्णपणे खचून गेले होते त्यात २३ जुन १७६१ रोजी त्यांचे निधन झाले.
जनकोजी शिंदे यांना कैद करण्यात करण्यात आले होते आणि नंतर अत्याचार करत त्यांना मारण्यात आले. नजीबच्या आग्रहाखातर इब्राहिम खान गारदी ला अत्याचार करून अफ़ग़ान सैनिकांनी ठार केले.
पानिपत लढाई परिणाम
लढाईचा परिणाम म्हणजे उत्तरेकडील मराठांच्या विस्तारीकरणावर विपरित परिणाम झाला. पुढील काळात पेशवा माधवराव यांचे शासन आल्यावर मराठा साम्राज्य पुन्हा अस्तित्वात आले. त्यांनी १७७१ मध्ये पानिपत च्या दहा वर्षांनंतर मराठा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि रोहल्या सारख्या अफगाणिस्तानच्या बाजूने असलेल्या अफगाणिस्तरीय शक्तींना शिक्षा देण्याच्या उद्देशाने उत्तर भारतात मोठे मराठा सैन्य पाठवून दिले. पानिपत नंतर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित होण्यास यामुळे पुन्हा सुरुवात झाली. मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली. या मोहिमेतील यश पानिपतच्या दीर्घ कथेचा शेवट म्हणून ओळखला जाऊ शकतो.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा
For More:
स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.
राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास
भारतीय अजित जैन यांची वॉरेन बफेट यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता