पुणे: वाहतुकीचे नियम तोडताय…. तर सावधान, कारण वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना आता पासपोर्ट मिळणे अवघड होणार आहे. पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम न भरल्यास वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई पुणे वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचा भंग केलेल्या ९२ जणांची पासपोर्टची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
सध्या पुणे वाहतूक पोलिसांकडे ९२ जणांवर वाहतूक नियम तोडल्यामुळे गुन्हे दाखल आहेत. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अटकाव घातला जाणार आहे. गुन्हा दाखल असलेल्या वाहनचालकाना खासगी व शासकीय नोकरी आणि लायसन्स न देण्याबाबत पुणे पोलिसांसकडून शिफारस करण्यात येणार आहे. हि मोहीमी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी हाती घेतली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असून त्यांना दंडाची रक्कम आॅनलाईन पद्धतीने जमा करावी लागते. परंतु काहीजण हि रक्कम जमा करत नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. असे गुन्हे दाखल असलेल्या वाहनचालकांची माहिती पोलीस पासपोर्ट कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलिसांच्या चारित्र्यपडताळणी विभाग यांना देणार आहेत. या कारवाईमुळे पासपोर्ट साठी पडताळणी करण्यास आलेल्या अर्जदारांना पासपोर्ट मिळण्यास अवघड होणार आहे.
आपल्या गाडीवर गुन्हा दाखल आहे का हे तपासण्यासाठी https://punetrafficop.net या संकेतस्थळाला भेट द्या.
ज्यांच्यावर वाहतुकीच्या नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत त्यांनी तातडीने दंड रक्कम भरावी. अन्यथा त्यांना भविष्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येणार आहे.
या मोहिमेमुळे आपणास पासपोर्ट मिळणे अवघड होणार आहे. पोलिसांनी पडताळणीमध्ये गुन्हा दाखल आहे असा शेरा दिल्यास पासपोर्ट कार्यालयाकडून मोठा दंड होऊ शकतो.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास