काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती रुग्णालयात शुक्रवारी निधन झाले.
पतंगराव कदम ७३ वर्षांचे होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने ते त्रस्त असल्याने त्यांना ३ मार्च रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांचे निधन झाल्याची वार्ता आली.
दरम्यान, पतंगरावांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ४ वाजता सांगलीतील वांगी गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.