पतंगराव कदम माहिती, राजकीय कारकीर्द, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सहकार क्षेत्र कार्य, पुरस्कार, Patangrao Kadam Biography

0
पतंगराव कदम माहिती, राजकीय कारकीर्द, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सहकार क्षेत्र कार्य, पुरस्कार, Patangrao Kadam Biography

पतंगराव कदम माहिती, राजकीय कारकीर्द, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सहकार क्षेत्र कार्य, पुरस्कार, Patangrao Kadam Biography

डॉ. पतंगराव कदम.. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं एक मोठं नाव.
महसूल, सहकार, वन, मदत आणि पुनर्वसन अशी महत्वाची खाती सांभाळत महाराष्ट्राच्या उभारणीस भरीव कामगिरी साकारनारा नेता..

डॉ. पतंगराव कदम माहिती राजकीय कारकीर्द

संपुर्ण नाव: पतंगराव श्रीपतराव कदम. 
जन्म : 8 जानेवारी 1944, मु. पो.सोनसळ, ता.कडेगाव (जि. सांगली) 
शिक्षण : एम. ए., एल. एल. बी., पी. एचडी. 
राजकीय कार्य : 
1985 ते 1991 आमदार 
1991 ते मे 1995 राज्याचे शिक्षणमंत्री. 
ऑक्‍टोबर 1999 ते ऑक्‍टोंबर 2004 : उद्योग,वाणिज्य आणि संसदीय कार्यमंत्री. 
नोव्हेंबर 2004 : सहकार,मदत व पुनर्वसन मंत्री. 
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती अध्यक्ष. 
डिसेंबर 2008 : महसूल,मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री, शालेश शिक्षण मंत्री. 
मार्च 2009 : महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य. 
नोव्हेंबर 2009 : वनमंत्री महाराष्ट्र राज्य. 
19 नोव्हेंबर 2010 ते 2014 : वने, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र 
2014 ते आजअखेर आमदार. 

सांगली जिल्ह्यातील सोनसळ या खेड्यातील शेतकऱ्याचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंत शाळा असल्याने पुढे कुंडल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पदवीपर्यंतचे शिक्षण सातारा जिल्ह्यात झाले. दहावी उत्तीर्ण होणारे ते त्यांच्या गावातील पहिले विद्यार्थी होते. शिक्षक पदविकेसाठी त्यांनी पुणे गाठले. पुढे ते द्विपदवीधर झाले. पुण्यात शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत काही दिवस रुजू झाले. पण काहीतरी मोठं आणि वेगऴं करायचे मनात बिंबवले असल्याने त्यांचे त्यात मन लागत नव्हते. राजकारणाची आवड असल्याने राजकारणात आले..
पतंगराव कदम यांच्या राजकीय कारकीर्द ची सुरुवात झाली १९६८ साली, ते पहिल्यांदा एसटी महामंडळाचे सदस्य बनले आणि तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची गाडी धावू लागली.

१९८० साली काँग्रेसचं तिकीट मिळावं यासाठी तरुणपणी खूप धडपड केली परंतु तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसची सर्व सूत्रे वसंतदादा पाटील यांच्याभोवती फिरत असत.. त्या वातावरणातही पतंगराव कदम अपक्ष म्हणून उभे राहिल्याने त्यांच्या धाडसाला लोकांनी साथ दिली परंतु काही शे मतांनी पतंगराव यांचा पराभव झाला. पहिली विधानसभा निवडणुकीत एवढी मते मिळाल्याने पतंगरावांनी अजून मेहनत घेत १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. आणि पतंगराव कदम पहिल्यांदा आमदार झाले. वयाच्या ४१ व्या वर्षी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. १९९१ ला ते पहिल्यांदा मंत्री झाले, शिक्षणमंत्री म्हणून मानाचे मंत्रिपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

डॉ. पतंगराव कदम आणि शरद पवार

१९९५ चा अपवाद वगळता सलग ६ वेळा पतंगराव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस मध्ये राहून त्यांनी अनेक मंत्रीपदे सांभाळली. महसूल आणि सहकारसारखी अत्यंत महत्वाची अशी खाती सांभाळत महाराष्ट्राच्या उभारणीला हातभार लावला. पुण्यातल्या हिंजेवाडीत आज मोठ्या दिमाखात उभं असलेलं आयटी पार्क पतंगरावांच्या दूरदृष्टीचं साक्षीदार आहे. राजकारणात सक्रिय सहभाग असतानाही त्यांनी शिक्षण काही सोडले नाही, त्यांनी ८० च्या दशकात Ph.D पूर्ण करत आपल्या नावापुढे डॉक्टर लावले, पुढे कुलपती झाले. अशा यशाच्या एक-एक पायऱ्या चढत पतंगराव आपली कारकीर्द गाजवत राहिले.

अनेकांशी मतभेद झाले, विचार पटले नाहीत परंतु प्रत्येकाशी मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या वेगळेपणामुळे सर्व मित्रपक्ष आणि विरोधी नेत्यांशी त्यांचे वेगळेच संबंध होते. एक मनमिळाऊ नेता म्हणून पतंगराव कदम यांची ओळख.

पतंगराव कदम शैक्षणिक क्षेत्रातील योगदान

भारती विद्यापीठाची १९६७ साली स्थापना करत हळुहळु या रोपाचं वटवृक्ष करून दाखवलं. सध्या देश-विदेशात मिळून या विद्यापीठाची तब्बल 180 महाविद्यालयं आणि संस्था आहेत. एवढे मोठं कार्य करणाऱ्या या नेत्याला सुरुवातीपासूनच संघर्ष हा करावाच लागला…

पतंगराव कदम यांचे सहकार क्षेत्रातील योगदान

सोनहिरा सहकारी कारखाना (वांगी, ता. कडेगाव), सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी (पलूस, जि.सांगली), ग्राहक भांडार आणि एका मल्टीशेड्युल्ड बँकेचीही त्यांनी स्थापना केली.

पतंगराव कदम यांना मिळालेले पुरस्कार

पतंगरावांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात करण्यात आले आहे. लोकश्री, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल ‘मानवता सेवा पुरस्काराने त्यांचा गौरव केला. मराठा सेवा संघाचा ‘मराठा विश्वभूषण पुरस्कार’, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’, ‘शहाजीराव पुरस्कार’, कोल्हापुरातील ‘उद्योग भूषण पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

अशा या नेत्यांचे ९ मार्च २०१८ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.