स्वामी विवेकानंद जयंती: ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण

0
स्वामी विवेकानंद जयंती: ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण

१२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस : वयाच्या २५ व्या वर्षी संन्यासी बनले विवेकानंद आणि जगाला भारताच्या सभ्यतेचा धडा दिला.

स्वामी विवेकानंद जयंती :

१२ जानेवारी १८६३ मध्ये कलकत्ता शहरात जन्मलेल्या स्वामी विवेकानंद यांनी धर्माला विज्ञानाच्या नजरने पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली. भारत सरकारने १९८४ ला स्वामी विवेकानंद जयंती हि राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.

जर कोणी आधुनिक भारताचा पाया घातला असेल तर ते विवेकानंद यांनी, असे म्हटले जाते. संपूर्ण जगला विवेकानंद यांनी हिंदू धर्माची एक नवीन व्याख्या दिली. त्यांनी सर्वांना भारताकडे पाहण्याची दृष्टी व वेदाची शिकवण दिली त्या शिकवनीलाच सगळे जगातील सर्वजण नतमस्तक होत असतात.
खरतर त्यांचं आयुष्य फक्त ३९ वर्ष. पण त्यांचे विचार असे काही होते की ते आजही जिवंतपणी मेलेल्या माणसाला जगण्यासाठीची प्रेरणा, ऊर्जा देत असतात. आज सर्वत्र युद्धस्थिती आणि उन्माद भासतो, पण त्यांनी बंधुभाव आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याची शिकवण दिली.

त्यांनी जगाला भारताची सभ्यतेचा धडा दिला. भारतामध्ये आज धर्मावरून जे चित्र तयार होताना दिसते आहे, तिथेच विवेकानंद यांची विचारधारा धर्मामध्ये स्वातंत्र्य असं आहे.

१८९३ ई. मध्ये अमेरिका के प्रसिद्ध शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म संसद मध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व स्वामी विवेकानंद यांनी केले होते. त्यांनी तिथे जे वेदांताचे ज्ञानार्जन केले त्याला तिथे आलेल्या वेगेवेगळ्या देशातील, धर्मातील लोकांनी दाद दिली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” असे मनातच प्रसन्नतेने सर्वांनी टाळ्यांनी दाद दिली. भारत सर्वांना परिवाराच्या दृष्टीने पहात असतो.

वयाच्या २५ व्या वर्षी संन्यासी बनले विवेकानंद आणि जगाला भारताच्या सभ्यतेचा धडा दिला.

वयाच्या फक्त २५ व्या वर्षी परिवार सोडून संन्यासी झालेले विवेकानंद हे लहानपणी खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि खोडकर असले तरी त्यांची विचारधारा ही धार्मिक होती.

स्वामी विवेकानंद प्रेरणादायी विचार :

त्यांना देशातील युवकांकडून खूप अपेक्षा-आशा होत्या. त्यांची व्याख्याने आजही पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. भारताचा वेदांत अमेरिका आणि युरोप मधील देशांमध्ये फक्त विवेकानंद यांच्या मुळेच पोहोचला गेला होता.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फॉलो करा.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघाला ११ वर्षानंतर विजेतेपद 

LEAVE A REPLY