प्लॅस्टिक बंदी: पुण्यात ८००० किलो प्लॅस्टिक जप्त, ३६९००० ₹ चा दंड वसूल

0
प्लॅस्टिक बंदी: पुण्यात ८००० किलो प्लॅस्टिक जप्त, ३६९००० ₹ चा दंड वसूल

पुणे: राज्यात आजपासून प्लॅस्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हॉटेल, दुकानदार, नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई पुण्यात देखील करण्यात येत आहे.

सकाळपासून दोन वाजेपर्यंत आठ हजार ७११ किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केले आहे.

त्यांच्याकडून जवळपास ३ लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती घनकचरा विभागाचे सुरेश जगताप यांनी दिली. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पाहण्यास मिळत आहे तर काही नागरिकांनी प्लॅस्टिक बंदीचे समर्थन केले आहे.
बंदीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली.
येत्या काळात ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे सुरेश जगताप म्हणाले. या बंदीबाबत जनजागृतीसाठी पालिका पाऊल उचलत आहे.

प्लॅस्टिक बंदी कशावर

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

सर, जाऊ नका! जी. भगवान या शिक्षकाच्या बदलीचा विद्यार्थ्यांनी केला विरोध

बाप: बा माझा हाडाचा शेतकरी

भय्यूजी महाराज सुसाईड नोट: भय्यूजी महाराज यांचे शेवटचे शब्द

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.