पंतप्रधान शरद पवार?
२६ लोकसभा सीट असलेल्या गुजराथ या राज्याचा व्यक्ती जर पंतप्रधान होऊ शकतो कारण तिथे प्रांताचा माणूस म्हणून आपुलकी आहे, पण ४८ सीट असलेल्या महाराष्ट्र राज्याचा व्यक्ती पंतप्रधान पदाचा दावा करत असेल तर तो पंतप्रधान होऊ शकत नाही असे म्हणणारे लोक त्याच्याच राज्यात आहेत, हीच बाब महाराष्ट्रासाठी कलंक आहे. हा कलंक महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात आहे आणी ह्या मातीशी गद्दारी करून इंग्रजांना फितूर होण्याचा इतिहास सुद्धा ह्याच मातीत आहे हे ह्या मातीचे दुर्दैव आहे.
पवार साहेब पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर या कमळीचा विचार न करता मी शरद पवारांच्या पाठीशी ताकद उभा करेल, महाराष्ट्रीयन माणूस पंतप्रधान व्हावा हे त्यांचे स्वप्न होते आणी हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब जाहीर सभेत बोलत असत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेच नाही तर अखंड महाराष्ट्राचे ७० वर्षांपासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण होण्याची संधी आदरणीय शरद पवार साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळते आहे कि नाही हे २८ मार्चला आपल्याला कळेलच आणी ह्या संधीला २६ राज्यातील ३० पेक्षा अधिक पक्षांचे समर्थन असणार आहे. तेव्हा फक्त महाराष्ट्राच्या खासदारांच्या जागा मोजू नका तर ह्या ३० पक्षांच्या २०१९ ला निवडून येणाऱ्या जागांचा सुद्धा आकडा काढा!
असे असले तरी पवारसाहेब यांच्या पाठीशी फक्त ते महाराष्ट्रीयन आहेत म्हणून त्यांना समर्थन द्या असे आंधळे समर्थन करणाऱ्यातला मी नाही, पवारसाहेबांना समर्थन का ह्यासाठी खालील काही मुद्दे जाणून घ्या!
शरद पवार यांचे योगदान
– किल्लारी भूकंपानंतर पुनर्वसन केलेला पॅटर्न हा जगभरासमोर आदर्श ठरेल असे भरीव काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
– उपेक्षितांच्या स्वाभिमानासाठी, डॉ. बाबासाहेबांच्या अभिमानासाठी सत्तेची तमा न बाळगता मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देणारा लढवय्या मुख्यमंत्री
– देश अन्यधान्य उत्पादनामध्ये कमी पडत असताना देशातील बळीराजाला मदतीचा हात देऊन आणि साथ देऊन सर्वाधिक उत्पन्न घेणारा आणि जगाला धान्याची निर्यात करणारा असा भारत देश बनवणार कृषिमंत्री
– संपूर्ण देशात OBC समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाला विरोध होत असतांनाही देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करून OBC समाजाला आरक्षण लागू करणारा धाडसी मुख्यमंत्री
– स्वामिनाथन आयोगाच्या १५ पैकी १४ शिफारसी दर वर्षी शक्य तितके बजेट वाढवून जश्याच्या तश्या लागू करणारे कृषिमंत्री
-गुजरात मधील भूकंप असो की दक्षिण भारतातील सुनामीचा कहर देशाला ज्या ज्या वेळी गरज पडली त्या वेळी पक्षीय मतभेद बाजूला सारून हिमालयाच्या (दिल्लीच्या) मदतीला धावून जाणार महाराष्ट्राचा सह्याद्री
-पंजाब मध्ये फुटीरतावादी आणि आतंकवादी कारायवाया वाढल्या असतांना तिथे शांती प्रस्थापित व्हावी आणि दहशतवादी उखडून टाकले जावेत म्हणून काम करणारा शांतिदुत आणि योद्धा
-देशात फळबाग योजना लागू करून देशाला दुसरी म्हणावी अशी फळबाग क्रांती घडवून आणणारा शेतकऱ्यांचा कृषिमंत्री
– दुष्काळग्रस्त बारामतीला सुजलाम सुफलाम बनवून भारतातल्या प्रत्येक ग्रामीण नेत्यासमोर विकासाचा आदर्शाचा पॅटर्न घालून देणारे स्थानिक नेतृत्व
– जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करून पिचलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची सुवर्णसंधी निर्माण करून देणारे कृषिमंत्री
– सैन्यदलात महिलांना १५% आणी राजकारणात महिलांना ३३% आरक्षण देऊन त्याची यशस्वी अंमलबजावणी करून घेणारे संरक्षणमंत्री
– BCCI च्या अध्यक्षपदी न भूतो न भविष्यती अशी अतिशय उत्कृष्ठ कामगिरी करून त्यांच्या कारकिर्दीच्या अखंडतेसाठी वयाची अट शिथील करण्याची गरज पडावी इतकी मोलाची कामगिरी बजावणारे, माजी खेळाडूंना पेंशन सुरू करणारे व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपला दबदबा निर्माण करणारे ICCअध्यक्ष
– खेळाडूंसाठी आणी कलाकारांसाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे कलागुणांना वाव न मिळण्याची परंपरा नष्ट करून त्यांना भविष्याची चिंता पडू नये म्हणून वेगवेगळ्या योजना आणी कायमस्वरूपी तरतुदींची अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री
– १९९९ च्या काळात काळीपिवळी आणी रिक्षावाल्यांकडून वाल्यांकडून सुद्धा हफ्तावसुली व्हायची ती बंद करण्यापासून ते आज पोलीसभरती प्रक्रियेत एक रुपयाही न भरता नौकरी मिळवण्याइतपत स्वच्छ कारभार करणारी यंत्रणा बदल्यात यशस्वी ठरलेले एक साधारण कार्यकर्ता ते आदर्श गृहमंत्री महाराष्ट्राला देणारे पवारसाहेब
– केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग आजन्म जसाच्या तसा लागू व्हावा म्हणून कायदा करणारे मुख्यमंत्री
- शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…..
- ‘माझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो’ : शरद पवार
असे अनेक मुद्दे मला मांडता येतील पण हे काही सुचले ते मांडलेत.
मोदीलाटे मुळे २०१४ मध्ये महाराष्ट्रात ४ खासदार निवडून आले, त्यावरून ४ आसनी नॅनो गाडीच्या क्षमतेवरून नॅनो पार्टी म्हणून चिडवणाऱ्यांनी ह्या बाबीचा विचार करावा
४ खासदार
४४ आमदार
४४४ पंचायत समित्या
४,४४४ जिल्हा परिषद सदस्य
४४,४४४ ग्रामपंचायत सदस्य
४,४४,४४४ पक्षाच्या शाखा
४४,४४,४४४ कुटुंब पक्षाशी जोडलेले
४,४४,४४,४४४ इतका जनसमुदाय पक्षाशी जोडलेला
फक्त पवारसाहेबांमुळे
राष्ट्रवादीचे हे पुनर्वसन झाले आहे ते फक्त ४ वर्षाच्या कालखंडात, २०१४ ते २०१८ ह्या कालखंडात. साहेब पंतप्रधान शरद पवार होवोत अथवा न होवोत पण २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातली सर्वाधिक मोठी पार्टी म्हणून उसळणार हो उसळणारच!
हे काम करणे शक्य झाले ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारे आणी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ठेवणारे भारतातील एकमेव नेतृत्व. जातील त्या गावात सभेत पक्षवाढीविषयी न बोलता शेतकर्यांना मार्गदर्शन करणारे, युवकांना प्रोत्साहन देणारे, महिलांच्या समान संधीचा आग्रह धरणारे, उपेक्षित वंचित यांच्या साठी वेळप्रसंगी सत्ता सुद्धा पणाला लावणारे, फक्त बोलून किंवा जाहिरातींमधून नव्हे तर कामातून स्वतःला सिद्ध करणारे फक्त पवारसाहेब
८०% समाजकारण आणी २०% राजकारण हा नियम पाळणारे, परिस्थितीचा अचूक अभ्यास करून निष्कर्ष काढणारे, कधीही द्वेषाचे राजकारण न करणारे, विरोधकांचे सुद्धा काम करणारे, कृषी ते क्रीडा अश्या सर्वच क्षेत्रात ठसा उमठवणारे अष्टपैलू नेतृव म्हणजे पवारसाहेब
श्रीयुक्त शरदचंद्रजी पवार साहेब हे आज दिल्लीच्या राजकारणाचा महत्वाचा दुवा ठरू पाहता आहेत ह्यातच त्यांच्या कार्यशैलीचा विजय आहे.
तोपर्यंत जर तरच्या बाबींवर हास्य विनोद करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला महाराष्ट्राच्या स्वप्नाला पूर्ण करणारा मावळा व्हायचे आहे कि इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करणाऱ्यांच्या वंशजांशी हातमिळवणी करून महाराष्ट्राच्या मातीशी फितुरी करायची आहे याचा निर्णय पक्का करून घ्या.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन, अखंड महाराष्ट्राचा विजय असो.
जर महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याची तुमची तयारी असेल तर हि पोस्ट ज्यास्तीत ज्यास्त शेअर करा..
दिल्लीचेही तख्त राखतो,
महाराष्ट्र माझा
हरहरमहादेव
लेखक: योगेश गावंडे
( लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. त्या मतांशी PuneriSpeaks सहमत असतीलच असे नाही. आम्हाला आपले लेख punerispeaks@gmail.com वर पाठवा )
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details
खूपच छान