देसी गर्ल, बॉलीवूड डीवा प्रियांका चोप्रा आपल्या हॉलिवूडमधील प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिचे भारतात येणे हे कमीच झाले आहे. भारतात एखाद्या कार्यक्रमासाठी येणे तिला सध्या तरी जमत नाही, तिच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भारतात आल्यावर सगळेच तिला त्यांच्या कार्यक्रमांत बोलावण्यासाठी धडपडत असतात. प्रियांका अमेरिकेत तिच्या क्वांटीको या सीरिअल च्या शूटिंग मध्ये व्यग्र असून ती डिसेंबर अखेर भारतात परतणार आहे. ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एका पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॉर्म करण्यासाठी प्रियांका येणार आहे. ती या कार्यक्रमात शिरकत करण्यासाठी मोठी रक्कम घेणार असल्याचे बोलले जातेय. जवळपास पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी प्रियांका एक नव्हे तर तब्बल पाच कोटी रुपये एवढी रक्कम घेणार असल्याचे बोलले जातेय. एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून येणार असल्याने ती एवढे पैसे आकारणार आहे.
सध्या प्रियांकाच्या नावाची फार चलती असल्यामुळे ती सांगेल तशी किंमत द्यायला निर्माते लगेच तयार सुद्धा होतात.
आयफा मध्ये तिचे मानधन ऐकूनच तिला वगळण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. जवळपास २ वर्षानंतर ती भारतात एखादा परफॉर्मन्स करत असल्याने सर्वांची नजर तिच्या डान्स वर असेल हे नक्की….
प्रियांका एका परफॉर्मन्स चे घेते एवढे मानधन..?
