पुणे सामुहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलं, 4 नराधमांना अटक

0
पुणे सामुहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलं, 4 नराधमांना अटक

पुणे | 14 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये समोर आलीय. पोलिसांनी याप्रकरणी 4 आरोपींना अटक केलीय.

रोहन जाधव, आदेश चौरे, संतोष माकर आणि अजय खोमणे अशी आरोपींची नावं आहेत. 14 नोव्हेंबर रोजी चौघांनी पीडित मुलीला नारायणपूर, जेजुरी आणि वाघपूर येथील लॉजवर नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तिची ससून रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यात बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं, त्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.