बलात्कार: एका वेश्येचा….. | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
बलात्कार: एका वेश्येचा….. | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

बलात्कार : एका वेश्येचा…..

एका गावात एक कुटुंब राहत असते. कुटुंब कसल जिथ घरचा करता पुरुष जातो तिथ ते कुटुंब-परिवार लोकांसाठी नसतच…….
अशा त्या घरात मिनाक्सी (मीनाक्षी नाही) अन तिची आई जोधाई दोघीच राहत असतात. नवरा दारू पिऊन मेला. जोधाई आणि मिनाक्सी धुण्याभांड्याची काम करत आपला घरखर्च भागवत. रोजच पावशेर तांदूळ, दहाची तुरडाळ आणि एक दिवसाआड पाचच लोणच आणून खात.
अस हे कुटुंब आपला गुजारा करत असताना एक दिवस मिनाक्सीवर एका घरी जबरदस्ती बलात्कार होतो. गुप्तांगावरची रक्ताची जखम तीन घातलेल्या पांढऱ्या पायजम्यावर स्पष्ट दिसत होती. तशीच मुंगीच्या वेगान घरी येऊन मिनाक्सी दारातच धडपडते. आईला सगळ बघूनच कळून जात काय झाल ते. आईने तिचे कपडे बदलले. तिच्या त्या जागेवर घरी असलेल डेटोल लावून तिला झोपवल. ती झोपली. तोवर आईने सगळ घर साफ केल.

तडकाफडकी पोलीस स्टेशन गाठल. जे काय घडल ते त्यांना रडून रडून सांगितल पण पोलिसांनी बदल्यात मजा घेत घेत पुन्हा पुन्हा कुठ लागल, कसा केला बलात्कार न बरच काही विचारल गेल. कोणी केला ? हा प्रश्न फक्त एखाद—दुसऱ्यांदा विचारल असेल.
अस हे वातावरण बघून ती आई जड दुखाने तिथून निघून न्यायाची आशा सोडून घरी आली. तेवढ्यात मिनाक्सिला जाग आली होती.

दोघींनी हे गाव कायमच सोडून जायचा विचार मनात बांधला आणि नव आयुष्य जगायला मुंबईत गेल्या. पहिल्यांदा तिथ बस स्थानकावर गुजारा करून नंतर पत्र्याच्या शेड मध्ये राहून गुजारा करू लागल्या. नंतर जिथ ती काम करत तिथल्या मालकाला सांगून मीनाक्सीसाठी मुलगा बघायला सांगितला. मुलगा मिळाला बारावी नापास. एका दुकानात काम करायचा. मिनाक्सी नाकेडोळी दिसायला चांगली आणि गोरी हि होती जराशी. त्यामुळे त्यान तिला आपलस केल.

अन लग्न झाल, एका गणपतीच्या मंदिरात एकमेकांना नारळ आणि लाडू चिवडा देऊन लग्न पार पडल. एक दहा दिवस झाले असतील. आणि मिनाक्सीचा नवरा अरुण दुकानात असताना त्याला पेपर वर मिनाक्सीचा फोटो दिसतो आणि मालकाला कारण देऊन घरी येऊन मिनाक्सिला खूप मारतो. रात्री पुन्हा दारू पिऊन येतो आणि मिनाक्सिला आणि तिच्या आईला दोघींनाही तो मारतो, आणि झोपतो. तेव्हा मिनाक्सिला पेपर दिसतो आणि त्यावर तिचा फोटो दिसतो. त्यात पोलिसांनी बातमी दिलेली असते. कि अशा एका मुलीवर बलात्कार झालाय आणि आता ती बेपत्ता झालीय कोणास सापडली तर संपर्क करा तिला न्याय मिळवून द्यायच्याय. रात्री दोनला मिनाक्सिला जाग येते आणि अरुण तिच्याकड बघत असतो. ती घाबरते पण त्याची दारू उतरलेली असते. तो तिला जवळ घेऊन म्हणतो आपण निघून जाऊ लांब इथून दोघंच. आणि काही प्रेमाच्या गोष्टी करून तो तिच्याशी एकदा प्रणय करतो. आणि मग पिशवीत तिचे कपडे भरतो. आणि हळूच दोघ घराबाहेर पडतात.

एके ठिकाणी दोघ जातात. खूप शांतता असते तिथ. पण लोक हि असतात. आपण आजची रात्र इथ राहू अस सांगून तो तिला आत घेऊन जातो.तिचा विश्वास बसतो कारण नवरा बायकोचा प्रणय हा असा धागा आहे कि त्यात फक्त प्रेम आणि खरे पणा असतो. म्हणून ती विश्वास ठेवते. ती झोपल्यावर अरुण तिथून पळ काढतो. सकाळी आईला इकड जाग येते. घर मोकळ, दार उघड तिची शोधाशोध सुरु होते. अरुण घरी येऊन आईला घराबाहेर हाकलून देतो. तिकडे मिनाक्सिला जाग येते, तिला तिच्याकड बघनाऱ्या बायका दिसतात. आणि क्षणातच तिचा हात पुढ ओढून एक रागट बाई तिला इंजेक्शन मारते आणि मीनाक्षी डोळे मिटून बेशुध्द होऊन पडते…

असच जेव्हा जेव्हा तिला जाग येई तेव्हा इंजेक्शनचे डोस तिला दिले जात. दोन दिवसाआड, एक दिवसाआड तिला खायला एखादा वडापाव दिला जायचा. या बलात्कार पिडीतेवर रोज बेशुद्धावस्थेत डोळे मिटल्यावर पैसे देऊन बलात्कार होत राहिले. आणि नंतर नंतर तिच्या उघड्या डोळ्यांसमोरही बलात्कार होतच राहिले. एक वर्ष तीन हलाखीत काढली. आणि एक दिवस तिन तिथून पळ काढला. ती यशस्वी झाली. नवरऱ्याला शोधून उपयोग नव्हता कारण तो तिला अस आपलस करणार नव्हता. करायचं असत तर त्यान इथ तिला सोडलच नसत. आईकड जाव तर आई माझ्यासाठी न्याय मागेल आणि माझ आयुष उध्वस्त होईल. या विचाराने. जवळ असलेल्या हजार रुपयात तीन हैद्राबाद गाठल. आणि तिथल्या रेड लाईट झोन मध्ये एक वेश्या म्हणून कामाला रुजू झाली.

एका काम करणाऱ्या नाजूक मुलीला तो नराधम वेश्या समजला. पिडीतेवर बलात्कार झाला म्हणून वेश्या बनवून गेला तो तिचा नवरा. आणि आता तर ती वेश्याच झालीय म्हणून हा कायदा त्या झालेल्या बलात्काराला कसे महत्व देईल ???

मिनाक्सीची शेवटची खून हैद्राबाद होती आता कुठ आहे काय माहित….

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणार्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

ठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण? काय घडली होती घटना…..

LEAVE A REPLY