पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी वाढीव कराचा बोजा हटवून सर्वसामान्यांची लूट थांबवावी : अशोक चव्हाण

0
पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी वाढीव कराचा बोजा हटवून सर्वसामान्यांची लूट थांबवावी : अशोक चव्हाण

सध्या पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतीवरून गदारोळ चालला आहे. पेट्रोल दरवाढ चा भुर्दंड नागरिकांना पडत असून विरोधी पक्ष यावर आक्रमक होताना दिसत आहेत.

राज्यात इंधनावर सरकारने लावलेला अन्यायी कर कमी करावा व त्यावरील विविध अधिभार तात्काळ रद्द करावेत तसेच पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून केली आहे.

संपूर्ण देशात महाराष्ट्रातच पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक असून याबाबत विचार करायला हवा असे अशोक चव्हाण यांनी पत्रात लिहिले आहे. १६ मे २०१४ रोजी भाजप सत्तेवर आल्यानंतर जागतिक पातळीवरील १०८ डॉलर प्रति बॅरल असलेले कच्च्या तेल जवळपास २५ – २७ डॉलर प्रति बॅरल एवढे आले तरीही सरकारने पेट्रोल दरवाढ तशीच ठेवली होती. डिझेलचे दर सुद्धा वाढीव ठेवले होते.
सध्या ७० डॉलर प्रति बॅरल असा दार असताना पेट्रोल, डिझलचे दर हे २०१४ वर्षीपेक्षा महाग विकले जातात आहे. सरकारने लावलेल्या कराच्या बोज्यामुळे हे दर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
वाढीव कराचा बोजा हटवून सर्वसामान्यांची लूट थांबवावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

अमित शाह यांनी बोलता बोलता येडीयुरप्पा सरकारलाच बोलले सर्वात भ्रष्टाचारी, आपल्याच मुख्यमंत्री उमेदवारावर केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काहीही करणार नाहीत, ते देशाला उद्ध्वस्त करतील, अमित शहांच्या भाषांतरकाराची मुक्ताफळे

LEAVE A REPLY