अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने तरुणांच्या पाठीशी उभं राहू : मा. शरद पवार

0
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने तरुणांच्या पाठीशी उभं राहू : मा. शरद पवार

एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय बजावू शकतात, असा प्रश्न सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासन पवारांनी दिले.

त्यांनी दिलेला पाठिंबा त्यांच्या स्वतःचा शब्दात:

सोशल मीडियावर लिहिणारे ७०च्या आसपास तरुण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येऊन आज मला भेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे दिसत नाहीत. पण लोकशाहीचा मूलभूत अधिकार आणि सेक्युलरिझम या दोन गोष्टींसंबंधी त्यांची भूमिका आग्रही दिसते. कुठे विसंगती दिसल्यास फेसबुकवर लिहून आपली मतं ते व्यक्त करतात. परंतु त्यांना धमकावण्याचा प्रकार त्यांच्या भागामध्ये स्थानिक पोलिसांकडून होतो आहे. त्यांच्या पाठीशी कुणी उभं राहण्याची गरज आहे. पक्षीय दृष्टिकोनातून नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या संबंधी भूमिका घणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे त्यांच्याविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याचे आश्वासन या बैठकीत दिले दिले. एवढंच नाही या तरुणांच्या विरोधात नोटिसा आणि खटले भरण्याचं काम सुरू आहे त्यासंबंधी काही कायदेशीर सल्लागारांना बोलावून घेऊन सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत. या माध्यमातून या तरुणांना दिलासा देण्यासाठी आजची बैठक होती.

आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. असे असताना सध्याची शासकीय व्यवस्था, निर्णय या विरोधात व्यक्त होणाऱ्या तरूणांना अधिकाराचा गैरवापर करत दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहे. तरूणींना गलिच्छ भाषेत धमकावलं जाते आहे. एका तरूणाला तर काही दिवस तुरूंगातसुद्धा डांबण्यात आले. हा कसला कायदा? सायबर सेलच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांनी तरूणांवर केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो. या अधिकाऱ्यांना राज्यसरकारकडून कोणत्या सूचना केल्या गेल्या त्याच्या खोलात जाणे गरजेचे आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील ओएसडी अधिकाऱ्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसतेय. या अधिकाऱ्याची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात होण्यापूर्वी, एका राजकीय पक्षाशी त्या संलग्न होत्या. तेव्हा माझ्या आणि माझ्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात गलिच्छ पोस्ट लिहिल्या गेल्या. याबाबत माझी काहीच तक्रार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्तीनंतर त्या सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे राजकीय पोस्ट टाकण्याचा त्यांना अधिकार नाही. हा प्रशासकीय शिस्तीचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा नोंद घ्यावी. सुसंस्कृत लौकिक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयातील असंस्कृत वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी ही आमच्या पाक्षाची मागणी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मूलभूत अधिकाराची गळचेपी करणाऱ्या या प्रवृत्ती विरोधात आम्ही कायम उभे राहू. असे मा. शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील भरपूर तरुणांना या बाबतीत नोटीस पाठवल्या असून त्यांची नावे खालीलप्रमाणे:

नोटीस मिळालेले युवक:

आशिष मेटे , औरंगाबाद
मानस पगार , नाशिक
विकास गोडगे , उस्मानाबाद
शंकर बहिरट , पुणे
योगेश वगाज , सोलापूर
श्रेणिक नरदे , कोल्हापूर
सचिन कुंभार , सांगली
ब्रम्हा चट्टे, सोलापूर

इतर तरुण :

डॉ. अमर जाधव
मल्हार टाकळे
योगेश बनकर
आकाश चटके
राहुल आहेर
योगेश गावंडे
इम्रान शेख
शरद पवार
अमित देसाई
धीरज वीर
भाऊसाहेब टरमले
मयुर अंधारे
अक्षय वळसे
अक्षय गवळी
प्रदिप तांबे
विकास मेंगाणे
विकास जाधव

अशा सर्वांना महाराष्ट्रभर नोटीस मिळाल्या असून त्यांची गळचेपी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मा. शरद पवार यांनी त्यांचे समर्थन करत त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.