लोकनेते शरद पवार आले धावून…..

0
लोकनेते शरद पवार आले धावून…..

लोकनेते शरद पवार: शरद पवार यांना जाणते लोकनेते का म्हटले जाते, याची आज अनेकांना पुनर्प्रचीती आली.

गडचिरोली दौऱ्यादरम्यान प्रवास करत असताना लोकनेते शरद पवार यांनी  भिवापूर – उमरेड रस्त्यावर, उमरेड पासून ५ किमी अंतरावर एका गाडीचा भीषण अपघात झाल्याचे पाहिले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वतः गाडीतून उतरत ते अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावून गेले.अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

डम्परवर धडकल्याने पुढून-मागून चक्काचूर झालेल्या त्या गाडीजवळ स्वतः पवार पोहोचले. गडचिरोलीचे रहिवासी अमित रामविलास यादव या गाडीतून आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत प्रवास करत होते. अपघातग्रस्त प्रवाशांना गाडीतून उतरता येत नव्हते.

पवारांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना गाडीतून उतरण्यास सहाय्य केले. जवळच्या रूग्णालयात जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यास पाठवले. त्यानंतर पवार  पुन्हा आपल्या दौऱ्यावर रवाना झाले. आपलं सामाजिक भान राखत, लोकांमध्ये राहून, लोकांसाठी धडपड करण्याची शरद पवार यांची कळकळ आज पुन्हा एकदा लक्षात आली.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details

पंतप्रधान शरद पवार? दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.