रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Mystery

0
रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Mystery

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Mystery

वेळ काढून वाचाच.

साडे सहा फुटाची राणी, काळीकुट आणि मऊ तलमासारखी….
पिळदार शरीर यष्टीची, दणकट आणि मालकासाठी हरदम तैयार म्हणजे झोप आराम विसरून कित्त्येक मैलांचं अंतर दिवस म्हणू नका आठवडे म्हणू नका कापत राहणारी. इतका आपल्या मालकाशी एकनिष्ठ असा हा घोडा माफ करा घोडी. आणि या बदल्यात राज खाद्य. राज घोड्याची उपमा. आणि श्री.श्री.छ.शिवाजी महाराज साहेब याचं तिच्यावर असलेल निस्सीम प्रेम. अशा विना शब्दांच्या प्रेमात वाद कधी नसायचा. आणि त्या घोडीला बोलता येत नसल तरी या राजाचा तिला त्रास नसायचा.

म्हणजे जेव्हा महाराजांनी हातात तलवार धरली त्याही आधी एक कुतुहूल म्हणून घोड्याची मारलेली रपेट तेही दादोजी कोंडदेव यांच्यासोबत आणि तिथून नंतर स्वतः घोडेबाजी शिकल्यापासून अखेरीच्या दक्षिण मोहिमे पर्यंत महाराजांचा घोडा काही सुटला नाही.

अस म्हणतात जिथ प्रेम असेल तिथ दगडाचा ही देव होतो. आणि दगडात ही देव घडतो. मग इथ तर दोन जिवांच प्रेम होत. घोडी आणि महाराज. मग तिचा त्रास होईल का महाराज साहेबांना? हा झाला भावनिक प्रश्न पण विज्ञानाच्या दृष्टिन बघायला गेल तर घोड्यावर बसून युध्द करणारे सोळाव्या शतकाआधीपासून ते हजाराव्या शतका पर्यंत हर एक राजा घोड्यावरूनच प्रदेश फिरायचा शिकार करायचा आणि युध्द हि करायचा पण प्रत्येक राजाचा मृत्यू हा युद्धात, कोणाचा घातपाताने. जखमी अवस्थेमुळे, अतिरिक्त दारू-व्यसनामुळे आणि विषबाधा मुळे झालाय.

शिवाजी महाराज मृत्यू रहस्य (Shivaji Maharaj Death Mystery)

पण गुडघादुखी या काल्पनिक आजारान कोणताच राजा काय पण साधा माणूसही मेला नाही. गुडग्याची वाटी जागची सरकेल, फुटेल, कालांतरान रद्द (कॅन्सर) ही होईल. पण गुडघादुखी हा रोग कसला आहे? आणि तीनशे वर्षापूर्वी शास्त्र प्रगत नसताना हा शोध लावला कुणी? याचाच अर्थ पुन्हा एकदा खोटा इतिहास आपण चघळत बसतोय. महाराज साहेब ३ एप्रिल १६८० ला निधन पावले. आणि इतिहास सांगतो. खूप काळ घोड्यावरून प्रवास केल्याने त्यांचे गुडगे निकामी झाले आणि गुडगेदुखी हा रोग झाला. त्याचे निदान हकीमाना न झाल्यामुळे महाराज निधन पावले. तर मग मला प्रश्न पडला की जर गुडगेदुखी हा रोग जर महाराजांना झालेला आणि तो हकीमाना बुवांना निदान नाही झाला. तर मग महाराज गेल्यावर काही बखरीत पत्रात गुडगेदुखी या दीर्घ आजाराने महाराज गेले अस का लिहील गेले? कोण इतका शहाणा होता ज्याला शोध लागला तोही महाराज गेल्यावर?

शिवाजी महाराज मृत्यू षडयंत्र (Shivaji Maharaj Death Mystery)

अख्या जगात फक्त महाराजांनाच कसा हा झाला रोग? हे षडयंत्र होत, अन त्यात ते सफल झाले, करणारे.

याच खर उत्तर आहे. महाराजांवर विषप्रयोग झाल्याचा अंदाज आहे. बर्याच इतिहासकारांना याचे मिळते जुळते पुरावे मिळाले असतील,आहे. पण सत्य बाहेर काढल तर लोकांना पटणार नाही. आणि पुन्हा उठेल जातीय वाद. यात काही जवळच्या म्हणजे अष्टप्रधान मंडळातील काही दोन तीन व्यक्तींनी मिळून हे षडयंत्र केले असणार. कारण नंतर च्या काळात संभाजी राजेंनी अष्टप्रधान मंडळात चाललेली हुल्लडबाजी उधळून लावली आहेत. पण पक्का पुरावा अजून नाही. कारण जो राजा आपल्या घरात राजाराम महाराजांचे लग्न थाटात लाऊन त्यांचा संसार सुरळीत करून देऊ शकतो. त्यानंतर दोन आठवडे काय तीन आठवडे राज्य कारभार बघत असताना. तो अचानक सकाळी मरण पावतो आणि दुपारपर्यंत स्वराज्यात बातमी पोचते कि राजे गेले…….. हे पटतय का तुम्हाला?

एक विचार आणि शंका होती हि माझी तुम्हाला काय वाटत नक्की सांगा. आणि काही माहिती असल्यास आम्हाला नक्की सांगा…..
जय शिवराय

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.