छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आवडत गाण

एक कुतूहल…..
हिंदवी स्वराज्य निर्माता, प्रजादक्ष, मोठ्या मनाचा राजा, सह्याद्रीच्या रांगातला मराठी अवाढव्य वाघ, मोघलांच्या मस्तकीचा ताप, महाराष्ट्राच्या जनतेचा तारण हार, माणसातला देव, तो जाणता राजा होता शिवाजी महाराज.

जसा राजा एक आदर्श व्यक्ती होता, तसाच तो गोरगरिबांच्या मनातली देव मूर्ती होता. तसाच कलागुणांत ही जाणकार आणि निपुण असणारा हा राजा होता.
चित्रकारांना राजांनी राजाश्रय दिला असेल. कवींना, संगीतकारानाही आश्रय दिला असेल.

मीर महंमद यांनी काढलेलं त्याचं चित्र बघितल असेल का नाही मला ठाऊक नाही पण पाहिलं असेल तर राजांनी पवित्र शब्दांनी त्यांची स्तुती केली असेल.

पण नेहमी सारखा मला आता ही एक प्रश्न पडलाय की निवांत क्षणी लढाईतून विजय मिळवून गडावर येताना. कधी गडावरच्या राजवाड्याच्या खिडकी कमानीतून आपल साम्राज्य बघताना आनंदान महाराज कोणत गाण गुणगुणत असतील बरे?

त्यांनी आश्रय दिलेल्या कवींनी जे गाण बनवल असेल, ज्या कवींनी राजेंच्या शौर्यावर काही कडवी लिहून चाल बद्ध केली असतील. किंवा काहींनी देवावर गाणी रचली असतील. अशी गाणी ध्यानात ठेवून राजे गुणगुणत असतील का? महाराजांच्या त्या जाड पुरुषी आवाजात ते गाण सूर खात असेल का? आणि नक्की कोणत ते गाण असेल जे राजेंच्या खूप आवडीच गाण असेल. ते कुणी लिहील असेल.
खुद्द राजेंनी लिहील नसेल पण त्यांच्या जवळच्या कर्त्यांनी कुठे तरी इतिहासात लिहील असेल किंवा राजेंनी हि लिहील असेल बहुदा दोन-चार ओळी आठवण म्हणून. पण जेव्हा त्या ओळी सापडतील कधी तेव्हा माझ कुतुहूल खूप वाढेल, त्या ओळींची चाल शोधण्यासाठी. काय असेल बरे ती चाल? आणि ते गाण संस्कृत असेल का शुद्ध मराठी भाषेतलं असेल. का उत्तम चालीच अरबी भाषेतलं गान असेल. हे जाणन मोठ रहस्यच आहे.

पण महाराजांबद्दल अभ्यास करताना मला हा पडलेला एक विचित्र प्रश्न आहे. म्हणून तुमच्यासमोर सादर केला.
तुम्हाला काय वाटतय? जाणावस वाटतय का तुम्हाला राजेंच आवडतीच गाण….त्याची चाल?
हा लेख काल्पनिक आहे पण यातली सत्यता नाकारता येत नाही. बहुदा माझा अंदाज आहे तुकारामांच्या अभंगातल कोणत तरी कडव असू शकत.

पण पक्का पुरावा नाही. बघू या प्रश्नच उत्तर कधी मिळतंय मला.

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY