सुरतेनंतर केलेली सर्वात मोठी लूट
बसरुरची स्वारी
महाराजांनी इ.स.1664 रोजी सूरत लुटल्यावर स्वराज्य संवर्धनाकडे जास्त लक्ष्य देण्यास सुरुवात केली. अहमदनगर आणि औरंगाबादजवळील काही ठाणी लुटल्यावर आपले काही स्वार हुबळी आणि आसपासची शहरे लुटन्यास पाठवली. त्यानंतर ‘बसरुर’ हे धनाढ्य शहर लुटन्यास महाराज स्वतः निघाले,आणि या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे मराठा आरमार.
बसरुरची स्वारी साठी मालवण नजीक आपले आरमार महाराजांनी सज्ज केले.जवळपास 3 मोठी जहाजे आणि 85 साधारण जहाजांचा ताफा यावेळेस सज्ज होता.आपला बेत गुप्त ठेवण्यासाठी महाराजांनी ‘मोगलांच्या जुन्नर येथील छावनीवर हल्ला करणार आहोत’ अशी हूल उठवली.
फेब्रुवारी 1665 मधे,सूर्योदयासमयी महाराजांची स्वारी बसनूर शहरी पोहोचली.कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना अचानक शत्रू समोर उभा दिसलेला बघुन शहरवासियांत गोंधळ वाढला.पूर्ण एक दिवस तिथे राहून मराठ्यांनी ‘श्रीमंतांकडून’ सारे धन लुटले.असे म्हणतात,की ही संपत्ती जवळ जवळ 2-3 कोटींइतकी होती.
तिथून पुढे कूच करुण महाराजांनी कडवाल,सिद्धेश्वर,मिर्जान,अंकोला,कोन्द्रे,हुमाउद या ठिकानांवर स्वार होऊन आपला अंमल बसवला.
या शहराचे नाव काही ठिकाणी बसनूर आहे,तर काही ठिकाणी हरहसनूर असे आहे.रायरीच्या बखरीत नुसते हसनूर आहे.प्रो.सरकार मात्र वसरूर असे नाव सांगतात.
सुरतेच्या पहिल्या लुटीनंतर झालेली सर्वात यशस्वी स्वारी,मराठा आरमाराने केलेली सर्वात अजोड कामगिरी आणि शिवरायांच्या युद्धकौशल्याची पुरेपूर जाणीव करुण देणारी इतिहासप्रसिद्ध ‘बसरुरची स्वारी’….
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का?