शिवजयंती सोहळा: शिवाजी महाराज आणि त्यांचे आधुनिक मावळे

2
शिवजयंती सोहळा: शिवाजी महाराज आणि त्यांचे आधुनिक मावळे

शिवजयंती सोहळा: शिवाजी महाराज आणि त्यांचे आधुनिक मावळे

शिवजयंतीची ज्योत आणणारे खुप खुश आहेत. कारण, ज्योत पकडणारे एकाड-एक अशी दोन तीन पोर नीट बाकीचे सगळे पिऊन टाईट आहेत. कोण म्हणत वर्धनगड, कोण म्हणत रायगड, कोणाला आठवतो सिंहगड आणि काहीच नाहीतर आठवतो छोटा अजिंक्यतारा, सज्जनगड. जाताना दारूला प्यायचं. येईपर्यंत गाडीत, टेम्पोत झोपायचं. गल्लीतल्या कोणीतरी रात्रीच महाराजांच्या मूर्तीला पुसून मंडपात ठेवायचं. आणि सकाळी आणलेली ज्योत तेवत ठेवायची. दारू उतरल्यावर आवरून बारा वाजता राजेंची पूजा करायची, कर्णकर्कश पोवाडे गाणी लावायची. शिवजयंती सोहळा चालू असताना अभिमानान सांगायचं आम्ही महाराजांचे मावळे. शिवाजी राजेंना बघून कोणी स्त्री-मुलगी नमस्कार करायला पुढे आली तर तिची छाती आणि कंबर बघणारी तिथ बसलेली ही पोर स्वताला शिवाजी राजेंचा मावळा समजतात, याची लाज वाटते.

गाडीवर, गाडीच्या काचेवर शिवाजी महाराजांचा फोटो चिटकवतात. आणि त्याच गाडीला घेऊन वर्षभर पोरींच्या मागे बायकांच्या मागे अधाश्यासारखे फिरतात. त्याच गाडीवर बसवून आपल्या प्रेयसीला घेऊन कुठे महाराजांच्याच किल्ल्यावर घेऊन जातात तिथे प्रणय करतात. आणि आरशात बघून उन्हाने ओघळलेली चंद्रकोर पुन्हा सरळ निट करतात. आणि तरीही स्वताला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतात. वर्षभर एकमेकांचा जीव घ्यायचा. वर्षभर जातीभेद करायचा. वर्षभर शिवाजी तुझा का माझा करायचा आणि शिवजयंतीला जिथ लाईटीचे खांब ही नाहीत तिथ वेगवेगळ्या जातीचे आप्पा, आण्णा, भाई यांचे बोर्ड लागतात. असे शिवाजी महाराज मस्त घोड्यावर वगैरेंची असतात आणि हे भाई लोग त्या घोड्याच्या पायाशी, पोटाशी नाहीतर शिवाजी महाराजांच्या नजरेला नजर देऊन पराक्रम गाजवल्यासारखे दिसतात. जातीशी एकनिष्ठ हे असे लोक या दिवशी मात्र स्वताला शिवरायांचा मावळा म्हणून घेतात.

शिवाजी महाराज नाही ब्रँड आहे सत्ताधारी नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षांचा… निवडणुकीला आमचे दैवत, आमचा राजा, आमचे कुलदैवत लिहून खाली राजेंचा फोटो आणि निवडणूक झाल्यावर त्या पक्षाच्या मुख्य नेत्याचा फोटो आणि वर लिहिलेलं दिसत आमचे दैवत. लाज वाटायला हवी. असे निर्लज्ज स्वतःला महाराजांचे मावळे म्हणवून घेतात.
आता तुम्हीच सांगा मला आज कोण कोण होणारे शिवाजी महाराजांचा मावळा?

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शिवजयंती च्या तोंडावर राजधानी रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला तडे

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

  1. जर तुम्हाला ऐवढि माहिती आहे तर तुम्ही का नियोजन करत नाही?

    असो, जर तुमच्या समोर अस कोणी करत असेल तर तुंही त्यांचि नावे घेऊन पोलीस तक्रार का केली नाही?

    तुम्ही दिलेली माहिती योग्यच आहे पण हे जगजाहीर पण आहे..!

  2. स्वप्नील शेळके कारण हे सर्वच जण बघतात कुणा एका ठीकानाची माहिती नाही हि

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.