शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात | Artista Ajinkya Bhosale | PuneriSpeaks

1
शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात | Artista Ajinkya Bhosale | PuneriSpeaks

शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात

शिवाजी महाराज कि जय…
शिवाजी अमर आहे नावाने आणि त्यांच्या पराक्रमाने, शिवाजी म्हणताना मी राजे, महाराज अस का बोलले नाही असा प्रश्न पडेल तुम्हाला पण या लेखात काही गोष्टी मी त्यांच्या बद्दल सांगणार आहे आणि ते ऐकल्यावर जर का तुम्हाला माझ्या बोलण्यात तथ्य वाटले तर शेवटी माझ्या सोबत तुम्ही पण घोषणा द्या. तो पर्यंत शिवाजी महाराजांना शिवाजीच म्हणेन पण आदराने….

किती ओळखतो आपण त्यांना? किती माहिती आहे आपल्याला शिवाजी या राजा बद्दल? त्यांचा किती इतिहास माहितीय आपल्याला? उत्तर आहे काहीच नाही. शिवाजी महाराज राजे होते पण आत्ता शिवाजी हा ब्रँड आहे राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा. न जाणो पुढे कधी राजकीय चिन्हांमध्ये जर का शिवाजी महाराजांचा चेहरा असलेल चिन्ह दिसल तर काहीच नवल वाटायला नको. शिवाजी, कितीस ते नाव आहे फक्त तीन अक्षरी. पण त्या नावात ताकद अफाट अचाट आहे.

कुठे पान टपरी, नगर, पेठ, दुकान, बोर्ड कुठेही हे नाव दिसत आपल्याला. ते नाव कुणा बापाच आजोबाच किंवा स्वतःचही असेल. ते काहीही असो पण शिवाजी नाव वाचल कि आपल्याला पहिले आठवतात शिवाजी महाराज. हि ताकद आहे त्या माणसाची.

दोन जातीत दंगल अशीच घडत नाही त्यासाठी लागतो महाराजांचा फोटो, नाव किंवा भगवा झेंडा. किती नालायकपणा आहे माणसांचा. आपणच बदनाम करतोय महाराजांना. कोण जातीला शिव्या देत नाही. कारण जात हीच एक माणसाला लागलेली घाणेरडी शिवी आहे. महाराजांनी जे जे काम केल ते ते लोककल्याणासाठी आणि चांगलच आदर्श अस काम केल आणि म्हणून त्या कामाची आठवण चारशे वर्ष झाली तरी आपण ह्या न त्या कारणाने काढतो. पण या चांगल्या कामाच्या बदल्यात उपकार म्हणून आपण काय देतो त्यांना? जे जे वाईट काम आहे जिथ राजकीय काळाधंदा आणि स्वतचा स्वार्थ, जिथ निवडून येण्यासाठी मत हवी आहे तिथ तीथ महाराजांचं नाव पुढ करतो. त्यांना म्होरक्या करतो आपण या वाईट कामात. याच साठी केला होता का त्यांनी स्वराज्य निर्मितीचा अट्टाहास?

इतिहास शोधेल तितका सापडतो आणि जमेल तितका वाढून चढवून लोकांसमोर आणला जातो. त्यामुळेच खरा शिवाजी कुणालाच माहित नाही आणि हे प्रत्येकान मान्य करायला पाहिजे. आता हेच बघा ना शिवजयंतीला रस्ते सजले होते, शिवमुर्तीच्या पूजेसाठी पण काही रस्ते तसेच सजलेले होते, तसे रस्ते सजवले जातील मार्च महिन्यातल्या तिथीनुसार शिवजयंतीला. देवाला जातीला वाटून घेतलच होत आपण आता या राजाला हि वाटल तारीख आणि तिथीनुसार.

पण राजा हा कोणा एका जातीचा नसतो. त्या राजावर कोणा एकाच जातीचा हक्क नसतो हे कळेल का कोणाला? आदर आपल्याला कायम असतो त्यांचा आणि असलाच पाहिजे. कारण त्यांनी थोड-थोडक काम नाही केल. सबंध भारतावर राज्य केलय तस बघायला गेल तर. भारत आत्ता स्वतंत्र झालाय पण चारशे वर्ष आधी स्वतंत्र भारताच स्वप्न त्यांनीच बघितल होत. आणि त्यांच्या नावाने नगर रस्ता पूल बांधताना फक्त बोर्ड वर छत्रपती शिवाजी महाराज लिहितात मग तिथून जाताना आपण पत्ता सांगताना लाज नसल्यासारखं फक्त शिवाजी म्हणायचं?… चुकत ना आपल?

शिवाजींचा आदर फक्त शिवजयंतीलाच असतो? बाकीचे दिवस का करत नाही? विचार करण्याची गोष्ट आहे.

शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात म्हणता म्हणता अखेर आपल्या घरात शिवाजी जन्मायचा जो बंद झालाय तो आता शेजारच्या घरात हि जन्माला येत नाही. हरकत काय आहे शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्माला आल तर? पण तो पर्यंत आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या कार्याची कदर केली पाहिजे. आणि गर्व असला पाहिजे आपल्याला कि जगाच्या पाठीवर हा असा एकमेव हरहुन्नरी जाणता राजा आपल्याला लाभला.

कळतायत का शिवाजी महाराज तुम्हाला कि हरवायचंय नाव त्याचं जसे त्यांचे किल्ले जीर्ण होऊन लुप्त होतायत. जसे वाघ संपत चाललेत तस शिवाजी नाव हि संपून जाईल एकदिवस आणि उद्या कधी विषय निघाला तर कोणत्यातरी जुन्या पुस्तकातला फोटो दाखवून पुढच्या पिढीला सांगाव लागेल कि बाबा हे आहेत शिवाजी महाराज.

चारशे वर्ष जपलं आपण नाव अजून हजार वर्ष जपायचय. शिवाजी नाव जपून ठेवायचं आहे हरवायचं नाही आपल्याला.

खर तर गरज नाही महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची. गरज आहे ती फक्त शिवाजी या तीन शब्दांना जवळून समजण्याची. बाकी महाराज आपल्या मनात आहेतच वर्षानुवर्षे.

छत्रपती शिवाजी महाराज कि…………………जय.

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

बायको: विचारा तिला छान आहे की…

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं

मी म्हणतो का कराव प्रेम | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.